टाटा टियागो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 08:40 PM2017-08-15T20:40:54+5:302017-08-15T20:41:01+5:30

टाटाची टियागो ही हॅचबॅक कार भारतीय बाजारात सादर होऊन एक वर्षही या मोटारीला पूर्ण झाले आहे. यामध्ये अॉटोगीयरचीही श्रेणी असलेली श्रेणी आता समाविष्ट करण्यात आली आहे. किंमत, दर्जा आणि नव्या सुविधा यांना चांगल्या रितीने सामावणारी ही कार आहे.

Tata tiago | टाटा टियागो

टाटा टियागो

googlenewsNext

टाटा मोटर्सची टियागो ही हॅचबॅक कार भारतीय बाजारपेठेत येऊन एक वर्ष झाले. पेट्रोल व डिझेल या दोन प्रकारच्या इंधनावर टियागो उपलब्ध असून साधारण इंडिका व्हिस्टापेक्षा ही रुंदी व  लांबीला लहान असणारी टियागो शहरी व शहराबाहेर हायवेवरही चांगली कार्यक्षम ठरत आहे. एक्सबी, एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड व एक्सझेड ए या सहा प्रकारच्या श्रेणीमध्ये ही विविध कमी अधिक सुिवधा, अंतर्गत सुविधा व सामग्री यामध्ये देण्यात आली आहे. पेट्रोल व िडझेलमध्ये याच चढत्या क्रमाने असलेल्या श्रेणीमध्ये टियागो उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समीशन म्हणजे ऑटो गीयरमध्येही पेट्रोल इंधनात ती सादर केली आहे.

तियागोमध्ये या विविध श्रेणींनुसार टायर्स, सौंदर्यरचना, एअरबॅग, म्युझिक सिस्टिम देण्यात आल्या आहेत. यामध्ये एक्सबी हे बेसिक मॉडेल आहे. १२०० सीसी इतकी इंजिनाची ताकद असून पीक अप, ब्रेकींग, गाडीची रस्त्यावरील पकड, एरोडायनॅमिक शेप आदी बाबींमुळे सुरक्षित  व आरामदायी प्रवासाला तियागो किंमतीच्या तुलनेतही सरस ठरू शकते. 

रंगसंगतीही चांगल्या आकर्षक व वेगळ्या छटांच्या असून  त्यात सनबर्स्ट ऑरेंज, पर्लसेंट व्हाईट, एस्प्रेसो ब्राऊन, स्ट्रायकर ब्ल्यू, प्लॅटिनम सिल्व्हर व बेरी रेड या रंगांचा समावेश आहे. 

 टियागोची तांत्रिक वैशिष्ट्ये -

पेट्रोल 

इंजिन- रिव्होटॉर्न १२०० सीसी (१.२ ली.), ३ सिलिंडर, मल्टिड्राईव्ह, इको व सिटी मोडमध्ये 

पेट्रोल, बीएस ४, 

कमाल ताकद - ८५ पीएस @ ६००० आरपीएम

कमाल टॉर्क - ११४ एनएम @ ३५०० आरपीएम

गीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. ऑटो गीयरमध्येही वरच्या श्रेणीत उपलब्ध

लांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३७४६/१६४७/१५३५

 व्हीलबेस - २४००

टिनर्ंग रेिडयस - ४.९ मी

ग्राऊंड क्लीअरन्स - १६५ व १७० मिमि. टायरच्या आकारानुसार विवध श्रेणीनिहाय.

बूट स्पेस २४२ ली.

ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रम

इंधन टाकी क्षमता - ३५ लीटर 

टायर व व्हील - पहिल्या तीन श्रेणींमध्ये १५५-८० आर १३ स्टील रिम

चौथ्या श्रेणीत१७५-६५ आर १४  स्टील रिम

पाचव्या टॉपच्या श्रेणीत - १७५-६५ आर १४ - अलॉय व्हील

 

डिझेल

इंजिन  - रिव्होटॉर्क १०४७ सीसी (१.०५ ली. ) ३ सिलिंडर

कमाल ताकद - ७० पीएस @ ४००० आरपीएम

कमाल टॉर्क - १४० एनएम @ १८००-३०००आरपीएम

Web Title: Tata tiago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.