या देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:17 PM2018-08-17T15:17:02+5:302018-08-17T15:20:21+5:30

20 हजार कारवर बंदी

South Korea To Ban About 20,000 BMW Vehicles After Engine Fires | या देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण?

या देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण?

Next

सेऊल : गेल्या काही महिन्यांत जगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडल्याने दक्षिण कोरियाने या कंपनीकडून विकल्या गेलेल्या तब्बल 20 हजार कारवर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. 


यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान बीएमडब्ल्यूच्या 27 कारला आग लागली होती. तपासाअंती इंजिनने पेट घेतल्याचे समोर आले होते. यामुळे लोकांमध्ये भीतीही निर्माण झाली आहे.  या प्रकरणी बीएमडब्ल्यूच्या कोरियाई प्लांटकडून माफी मागण्यात आली असून जवळपास 1 लाखावर डिझेलच्या कार माघारी बोलविण्यात आल्या आहेत. यामध्ये कंपनीच्या अलिशान 520डी या कारचाही समावेश आहे. 


कंपनीने जरी या कार माघारी बोलावल्या असल्या तरीही यापैकी 20 हजार कारची अद्याप तपासणी व्हायची आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन या कार रस्त्यावर आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी दक्षिण कोरियाचे वाहतूक मंत्री किम ह्युन-मी यांनी बीएमडब्ल्यू कार मालकांना या कार मोठी दुर्घटना घडण्याआधीच कंपनीकडे परत कराव्यात, असे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


दक्षिण कोरियामध्ये मागील पाच वर्षांत बीएमडब्ल्यूच्या कारची विक्री दुपटीने वाढली आहे. गेल्या वर्षी 59,624 कार विक्री झाली होती.

Web Title: South Korea To Ban About 20,000 BMW Vehicles After Engine Fires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.