छोट्या कार्समध्ये शहरवासीयांची पसंती मारुती सुझुकीची अल्टो के १०

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 01:24 PM2017-10-11T13:24:20+5:302017-10-11T13:28:31+5:30

मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या व पटणाऱ्या छोटेखानी मोटारी ही मारुतीची मूळ संकल्पना नवीन काळातही अल्टो के १० ने कायम राखली आहे

in small cars Maruti Suzuki's Alto 10 is preferred | छोट्या कार्समध्ये शहरवासीयांची पसंती मारुती सुझुकीची अल्टो के १०

छोट्या कार्समध्ये शहरवासीयांची पसंती मारुती सुझुकीची अल्टो के १०

Next
ठळक मुद्दे२०१२ मध्ये सौंदर्यात्मक बदल करण्यात आले. काहीशी सुधारणा त्यात केली गेली होतीसध्याच्या स्पर्धक असणाऱ्या कारमध्ये हे सर्वात जुने मॉडेल म्हणावे लागेलमोठ्या कारच्या आकर्षण असणार्या सध्याच्या बाजारात आजही स्पर्धेत तशी तग धरून आहे

लहान कारमध्ये मारुती ८०० ची जागा घेण्यासाठी मारुती सुझुकीने अल्टो ही कार आणली त्यानंतर के सीरिजचे इंजिन आणून अलेटो के १० ही अल्टो ८०० पेक्षा थोडीशी मोठी अशी हॅचबॅक कार भारतीय ग्राहकांपुढे सादर केली. शहरांमधील क्लीष्ट वाहतूककोंडीमध्ये कार चालवण्यासाठी छोट्या मोटारींचा वापर होतो व शहरी वापरही वाढल्याने मध्यमवर्गीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून मारुतीने केलेली सुरुवात भारतीयांना भावलेली आहे, यात शंका नाही. काळानुसार पेट्रोल, ऑटोगीयर व सीएनजी या तीन प्रकारतच्या अल्टो के १० या मोटारी ग्राहकांना उपलब्ध असून अजूनही अन्य कंपन्यांच्या मोटारींच्या तुलनेत मारुतीच्या या छोट्या कारना मागणी आहे. शहरी व ग्रामीण मध्यमवर्गीय व विशेष करून पहिल्यांदाच कार घेणारे साहजिकच मारुतीच्या मोटारींकडे वळतात, हे मारुतीने भारतात आगमन केल्यानंतर पारंपरिक अशा प्रीमियर, अॅम्बेसेडर कारच्या तुलनेत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे ग्राहकांच्या मनात खोलवर रुजलेले 'कारसंस्कार' म्हणावे लागतील. ते किती योग्य वा अयोग्य यापेक्षा भारतीय मध्यमवर्गीयांना कार वापरण्याची मानसिकता तयार करून देण्याचे सारे श्रेय निःसंशय मारुतीकडे जाते यात शंका नाही.

मारुती सुझुकीची अल्टो के १० ही त्याच प्रकारातील कार असून छोट्या कुटुंबाला, शहरातील व कधीमध्ये काहीशा लांब पल्ल्याच्या प्रवासालाही जाता येईल अशी एक छोटी कार आहे.मोठ्या कारच्या तुलनेत जागा, लेग स्पेस कमी असली तरी साधारण मध्यमउंचीच्या माणसांना पुरेशी लेगस्पेस आहे. मात्र मागील आसनावर तीनऐवजी दोन माणसे जास्त नीट बसू शकतील.

अल्टो १० एलएक्स, एलएक्सआय व व्हीएक्सआय या तीन प्रमुख श्रेणींमध्ये असून मॅन्युअल ट्रान्समीशन, ऑटोगीअर व सीएनची या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध श्रेणी निहाय सुविधा वेगवेगळ्या देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे

- २०१२ मध्ये सौंदर्यात्मक बदल करण्यात आले. काहीशी सुधारणा त्यात केली गेली होती.

- सध्याच्या स्पर्धक असणाऱ्या कारमध्ये हे सर्वात जुने मॉडेल म्हणावे लागेल.

- मोठ्या कारच्या आकर्षण असणार्या सध्याच्या बाजारात आजही स्पर्धेत तशी तग धरून आहे.

- कमाल मायलेज लीटरला २४.०७ कि.मी.

- ऑटोगीयरमुळे अनेकांना चालवायला सुलभ बनवली गेली.

- वरच्या श्रेणीमध्ये एअरबॅग, फॉग लॅम्ब,स्पोर्टी बोल्ड लूक, एरोडायनॅमिक आकार,ड्युएल टोन इंटिरिअर्स,पियानो सारख्या बटनांचा स्टिरिओ, म्युझिक सिस्टिम.कीलेस प्रवेश.

अल्टो के १० ची तांत्रिक वैशिष्ट्ये

पेट्रोल

इंजिन- के सीरिज, के १० बी ९९८ सीसी (१.० ली.), ३ सिलिंडर,

पेट्रोल, बीएस ४,

कमाल ताकद - ६८ पीएस @ ६००० आरपीएम (पेट्रोल)

कमाल ताकद - ५९ पीएस @ ६००० आरपीएम (सीएनजी)

कमाल टॉर्क - ९० एनएम @ ३५०० आरपीएम (पेट्रोल)

कमाल टॉर्क - ७८ एनएम @ ३५०० आरपीएम (सीएनजी)

गीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. ऑटो गीयरमध्येही वरच्या श्रेणीत उपलब्ध

लांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३४४५/ १४९०/ १४७५

व्हीलबेस - २३६० मिमि

टर्निंग रेडियस - ४.६मी

ग्राऊंड क्लीअरन्स - १६० मिमि.

ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रम

इंधन टाकी क्षमता - ३५ लीटर/ ६० लीटर सीएनजी (पाण्याच्या समप्रमाणातील क्षमता)

टायर व व्हील - १५५/६५आर १३ स्टील रिम

कर्ब वेट - ७४० ते ७५५ किलोग्रॅम ( विविध श्रेणीनुसार)

ग्रॉस वेट -१२१० किलोग्रॅम

Web Title: in small cars Maruti Suzuki's Alto 10 is preferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.