पेट्रोलपंपावरच्या बेतालपणालाही आता आवर घालण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:55 AM2017-08-21T11:55:17+5:302017-08-21T11:56:56+5:30

गेल्या आठड्यात फेसबुकवर एक गंमतशीर व्हिडियो पाहायला मिळाला. पेट्रोलपंपावर एक कार येते. पंपाजवळ कार अशा पद्धतीने उभी करते की पंपातून पेट्रोलचा पाईप काही कारच्या पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचत नाही.

senseless behavior at petrol pump | पेट्रोलपंपावरच्या बेतालपणालाही आता आवर घालण्याची गरज

पेट्रोलपंपावरच्या बेतालपणालाही आता आवर घालण्याची गरज

Next
ठळक मुद्दे पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर करू नये असेही लिहिलिले असतेमोबाईल तर हल्ली पुढे लावलेला असतो. तो चालू असतो. तो बंदही कोणी करीत नाहीत यावर कारवाई काही नाही व कोण करणार हा प्रश्नच आहे

गेल्या आठड्यात फेसबुकवर एक गंमतशीर व्हिडियो पाहायला मिळाला. पेट्रोलपंपावर एक कार येते. पंपाजवळ कार अशा पद्धतीने उभी करते की पंपातून पेट्रोलचा पाईप काही कारच्या पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचत नाही. कारमधून एक तरुणी खाली उतरते व पाईप सर्वप्रकारारे ओढून ताणून कारच्या पेट्रोल टाकीपर्यंत न्यायचा प्रयत्न करते पण पेट्रोल काही भरता येत नाही अखेरीस पेट्रोलची टाकी पाईपाजवळ आण्यासाठी चार लोकांच्या मदतीने कार चक्क एका बाजूला उलटी पाडते आणि पेट्रोल भरते. पेट्रोल भरण्यासाठी कार काही सरळमार्गाने थोडी पुढे आणत नाही. एक तर ती तरुणी मूर्ख म्हणता येईल किंवा हेकेखोर. पेट्रोल पंपावर कार किंवा वाहन पेट्रोल भरण्यासाठी नेल्यानंतर कसे वागावे, वाहन कसे लावावे, याची पद्धत अते. पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर करू नये असेही लिहिलिले असते, तेथे ज्वलनशील असे सिगरेट पेटवणे, उदबत्ती लावणे असेही मूर्खपणाचे धोकादायक कृत्य करू नये. पेट्रोल भरण्यासाठी ठरवलेल्या रांगेत यावे इत्यादी ...पण सारे काही माहिती असते. लिहिलेले वा सांकेतिक खुणांनी  स्पष्ट केलेले असतानाही अनेक जण अनेक बाबींचे उल्लंघन करीत असतात.
मुंबईसारख्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलप्रमाणे काही पंपावर सीएनजीचीही सोय आहे. काही ठिकाणी सीएनजीचे स्वतंत्र पंपही आहेत. पण अनेकांना इतकी घाई असते की त्या ठिकाणी घुसून अन्य लोकांच्या सौजन्याचा फायदा घेण्याची फार आवड असते. मोबाईल तर हल्ली पुढे लावलेला असतो. तो चालू असतो. तो बंदही कोणी करीत नाहीत उलट एखादा फोन आला तर तो न घेता कट करण्याऐवजी बोलायला सुरुवात करणारे महाभागही आहेत. वाहन चालवणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश आहे.काही मोटारींमध्ये उदबत्ती लावलेल्या स्थितीतही पंपावर ती उदबत्ती आधीच न विझवता कार घालणारे चक्रमही आहेत. मुळात अशा साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते वा बेफिकीर राहिले जाते ही चिंतेची बाब आहे. अशावेळी कोणी दुसरा वाहनचालक ओरडून सुनावतो तेव्हा ही माणसे सरळ येतात. मुंबईसारख्या शहरात काय किंवा अन्य कुठेही पेट्रोल वा डिझेल भरण्यासाठीजाताना असे वर्तन हे गैरवर्तन असते, विसरलोच म्हणून चालणारे नाही. शिक्षा करण्याची तरतूदही असले कदाचित पण दुर्घटना झालीच काही मोठी तर शिक्षा कसली व कोणाला भोगावी लागेल याचा विचार करणे गरजेचे आहे. इंधन भरण्यासाठी घुसणे हा दुचाकी चालवणाऱ्या नवीन पिढीतील अनेकांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखेच काहींना वाटते. अशा प्रकारचे पेट्रोलपंपावरचे वर्तन हे वर नमूद केलेल्या त्या व्हिडियोतील तरुणीच्या वर्तनापेक्षा काही वेगळे आहे असे म्हणवत नाही. मोबाईलचा वापर करू नये असे स्पष्ट सर्वत्र नमूद असतानाही कारचालक,, दुचाकी चालक पेट्रोलपंपावर काय व प्रत्यक्षात वाहन चालवतानाही तो मोबाईल कानाला लावून बोलत पेट्रोलपंपापर्यंत येतात. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बंद करायला सांगितले की फार उद्धटपणाने वा आपण काही उपकार करत आहोत अशा थाटात मोबाईल बंद करतात. यावर कारवाई काही नाही व कोण करणार हा प्रश्नच आहे.
यातही गंमत अशी की सज्ञान झाल्यावर वाहन चालवण्याचा परवाना मिळतो पण तेव्हा देखील या महत्त्वाच्या बाबी शिकवल्या जात नाहीत, आरटीओमध्येही विचारल्या जात नाहीत. अर्था सज्ञान म्हणून परवाना मिळण्याचे वय झाल्यानंतर या गोष्टी शिकवण्याच्या मुळीच असत नाहीत पण तशा चांगल्या सवयी स्वतःहून समजून शिकण्यासारख्या आहेत. सिग्नल पाहून रस्ता क्रॉस करणारा कुत्राही जाहिरातीमध्ये भाव खाऊन जातो. पण माणूस मात्र अजूनही त्याच्यासारखा शहाणा होत नाही, हेच त्यातून सिद्ध होत नाही का? पेट्रोलपंपावर कसे वागावे, कसे वर्तन करावे याचेही जर धडे देण्याची वेळ आली असेल तर मग मात्र वाहन चालवण्याची पात्रताव त्याबाबतचे निकष अजून कठोर करावी, अशीच मागणी करावी लागेल.

Web Title: senseless behavior at petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.