ठळक मुद्देस्कूटरची उंची कमी असते, तिची चाके साधारण ९०/१०० चे टायर त्या स्कूटरला असतातखडडे, स्पीड ब्रेकर्स वा खाचखळगे या सर्वांमधून स्कूटर चालवणे हे अतिशय कठीण काम आहेअशा रस्त्यांवर बेधडकपणे ड्राईव्ह करताना स्कूटरच्या शरीरालाही दणके जाणवतात

भारतीय बाजारपेठेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्कूटर या दुचाकीचा चांगलाच बोलबाला झाला. विशेष म्हणजे ऑटोगीयर पद्धतीमुळे महिलांना, कमी उंचीच्या व्यक्तींनाही त्या चालवणे सोपे असल्याने स्कूटरची विक्री व आवश्यकता वाढली. मोटारसायकलपेक्षा कमी मायलेज देणाऱ्या असतानाही स्कूटर्सची वा स्कूटीची वाढलेली लोकप्रियता पाहिली तर स्कूटर्सचा वापर आता मोटारसाायकलप्रमाणे होऊ लागला. लांब जाण्यासाठीही कमी मायलेज असतानाही स्कूटर वापरली जाऊ लागली. त्याचप्रमाणे त्या स्कूटरमध्ये असणारी सीटखालील जागा, मागच्या बाजूला बसणाऱ्यासाठी असलेली जागा व तेथे पिशवीही बांधता येऊ शकेल अशी जागा, पायापुढेही काही वस्तू ठेवता येईल, अशी जागा मिळाल्याने स्कूटरसाठी लोकांचा कल वाढला त्यात नवल नाही. 

पण या स्कूटरला मोटारसायकलीप्रमाणे वेगाने चालवण्याचा वा कशीही कोणत्याही रस्त्यावर नेण्याचा प्रघात पडला गेला. ग्रामीण भागात त्याला काही इलाज नाही, पण तरीही लोकांनी ते स्वीकारले आहे. अर्थात काही असले तरी स्कूटर चालवताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. दिसायला स्कूटर छोटी असली तरी उपयुक्तता मोठी आहे, पण म्हणून ती मोटारसायकलीप्रमाणे वेगाने व कोणत्याही रस्त्यावरून धडधडत नेणे चुकीचे आहे, रस्ता पाहून ती चालवणे अतिशय गरजेचे आहे.याचे कारण त्या स्कूटरची असलेली रचना लक्षा घेण्याची गरज आहे. ती लक्षात घ्या व तिच्या मर्यादाही लक्षात घ्या, हे सुरक्षितततेच्यादृष्टीनेही महत्त्वाचे आहे.

स्कूटरची उंची कमी असते, तिची चाके साधारण ९०/१०० चे टायर त्या स्कूटरला असतात. ही रचना मोटारसायकलीसारखी नव्हे. हल्ली काही स्कूटर कंपन्यांनी मोठी चाकेही आणली आहेत, मात्र ती चाके वा टायर यांचा आकार हा काही मोटारसायकलीसारखा नाही. त्यामुळे रस्त्यांवर असलेले पेव्हरब्लॉक, त्यांना असणारे खळगे, त्यात तयार झालेले उंचवटे, सखल भाग, भेगा, गटाराच्या वर ठेव्यात आलेली लोखंडी झाकणे, रस्त्यांवर असलेले खड्डे,सिमेंटच्या रस्त्यांवर असलेल्या उभ्या ब्लॉक्समधील न भरलेल्या भेगा, रस्त्यांवर वरच्या पृष्ठभागाचे उडालेले आवरण, त्यामुळे पडलेले खडडे, स्पीड ब्रेकर्स वा खाचखळगे या सर्वांमधून स्कूटर चालवणे हे अतिशय कठीण काम आहे. तुमचा कंट्रोल आहे, असे जरी म्हटले तरी अशा रस्त्यांवर बेधडकपणे ड्राईव्ह करताना स्कूटरच्या शरीरालाही दणके जाणवतात, तुम्हाला त्रास होऊ शकतो, स्कूटरच्या सस्पेंशनचे नुकसान होत असते.

स्टिअिरंग रॉड ज्या ज्या घटकांवर आधारलेला असतो, त्याचेही नुकसान होत असते. हे लक्षात घेतले तर रस्त्यावर जाताना स्कूटरच्या चाकांचा लहान असणारा परिघ, त्याची लहान व निमुळती रूंदी, त्याच्या व्हीलची ताकद तसेच त्याचे वजनानुसार असणारे सस्पेंशन यामुळे स्कूटरचा वेग रस्ता पाहून ठरवावा. किंबहुना अतिशय बळूवार पणे स्कूटर ड्राईव्ह करणे गरजेचे अन्य़था स्कूटरला बसणारे दणके, धक्के, टायरची रस्त्यावर सुटणारी ग्रीप वा पकड, त्यामुळे ढासळणारे नियंत्रण, ब्रेक्सवर येणारा ताण व त्यामुळे वायर तुटण्याची असणारी मोठी शक्यता अशा विविध त्रासांना तोंड द्यावे लागते. त्याचे परिणाम स्कूटरचे आयुष्य कमी होणे, सुट्ट्या भागांचे आयुष्य कमी होणे, ते वारंवार बदलावे लागणे, त्याच्या देखभालीत जास्त लक्ष द्यावे लागणे व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षितताही अयोग्य पद्धतीने स्कूटर ड्राईव्ह करण्याने धोक्यात येते.

यासाठीच स्कूटरची एकंदर रचना लक्षात घेता ती मोटारसायकल अजिबात नव्हे. कोणी मोटो स्कूटो असे नाव दिले तरी त्या स्कूटरची रचना ही काही मोटारसायकलसारखी होत नाही. वेगासाठी पीकअप चांगला असला म्हमजे ती मोटारसायकल होत नाही. चाके लहान असल्याने स्कूटर ही तिच्या ताकदीनुसार व क्षमतेनुसार चालवणेच योग्य आहे, अन्यथा त्रास तुम्हालाच हे नक्की.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.