Review: कशी आहे नवीकोरी 2017 Maruti Suzuki S Cross?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 07:57 PM2018-03-26T19:57:18+5:302018-03-26T19:57:18+5:30

2017 Maruti Suzuki S Crossला गेल्या वर्षी नव्या रुपात लाँच करण्यात आलं होतं. खरं तर हे फेसलिफ्ट मॉडल छोट्या-मोठ्या सुधारणांसह बाजारात उतरवण्यात आलं आहे. 'लोकमत न्यूज'नं आठवडाभर Maruti Suzuki S Cross वापरून पाहिली. कारमधील वैशिष्ट्यं आणि उणिवा जाणून घेतल्या. आधीच्या माॅडेलपेक्षा ही कार चांगली आहे का, हे तपासून पाहिलं.

Review: How is the new year 2017 Maruti Suzuki S Cross? | Review: कशी आहे नवीकोरी 2017 Maruti Suzuki S Cross?

Review: कशी आहे नवीकोरी 2017 Maruti Suzuki S Cross?

Next

नवी दिल्ली- भारतीयांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेल्या मारुती सुझुकी या कंपनीने एक नवीकोरी, चकाचक आणि टकाटक कार बाजारात आणली आहे. भारतीय ग्राहकांचा विचार करून ही कार डिझाइन करण्यात आली असून काही खास फीचर या कारमध्ये देण्यात आली आहेत. बाजारात दबदबा असलेल्या मारुती सुझुकीची ही कारही लोकप्रियतेचा नवा उच्चांक प्रस्थापित करू शकते.

कॉम्पॅक्ट, हॅचबॅक, सेडान आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकाराव्यतिरिक्त क्रॉसओव्हर गाड्यांमध्येही मारुती सुझुकीनं चांगली पकड मिळवली आहे. कंपनीनं क्रॉसओव्हर प्रकारात पहिल्यांदा 2015मध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी मारुती सुझुकी एस क्रॉसकार कंपनीनं लाँच केली होती. परंतु ग्राहकांनी तिला फार पसंती दिली नव्हती. कालांतरानं क्रॉसओव्हर प्रकारात ग्राहकांची रुची वाढली. त्यानंतर मारुतीनं एस क्रॉसचं फेसलिफ्ट मॉडेल बाजारात उतरवलं. या फेसलिफ्ट मॉडेलनं कंपनीच्या जुन्या मॉडेलपेक्षा जास्त कमाई केली. 2017 Maruti Suzuki S Crossला गेल्या वर्षी नव्या रुपात लाँच करण्यात आलं होतं. खरं तर हे फेसलिफ्ट मॉडल छोट्या-मोठ्या सुधारणांसह बाजारात उतरवण्यात आलं आहे. 'लोकमत न्यूज'नं आठवडाभर Maruti Suzuki S Cross वापरून पाहिली. कारमधील वैशिष्ट्यं आणि उणिवा जाणून घेतल्या. आधीच्या माॅडेलपेक्षा ही कार चांगली आहे का, हे तपासून पाहिलं.

2017 Maruti Suzuki S Crossमध्ये सर्वात मोठा बदल हा फ्रंट प्रोफाइलमध्ये करण्यात आला होता. ते पाहून कारला किती अपडेट केलं आहे हे लगेचच लक्षात येतं. कारला स्लेट क्रोम ग्रिल बसवण्यात आल्यामुळे कार आणखी बोल्ड आणि आकर्षक दिसते. यावेळी कारमध्ये प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट, एलईडी फॉग लँप आणि स्पोर्टी बंपर बसवण्यात आला आहे.

कारच्या फ्रंड प्रोफाइलमध्ये बदल केलेला असला तरी साइड प्रोफाइलमध्ये कोणताही बदल नाही. इथे तुम्हाला फक्त डायमंड कट एलॉय व्हील पाहायला मिळेल. त्यामुळेच गाडीच्या लूकला एक प्रकारची चकाकी येते. साइड प्रोफाइलसारखेच कारच्या मागच्या भागात कोणताही मोठा बदल केलेला नाही. तसेच कारचं इंटिरियर स्पेसही मस्त आहे. मारुती सुझुकीच्या गाड्या या आरामदायी कारचं आदर्श उदाहरण आहेत. ही कारही त्याला अपवाद नाही. कारमध्ये बसल्यावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं.

कारमध्ये वापरण्यात आलेली प्लॅस्टिकची क्वालिटी खूपच चांगली आहे. डॅशबोर्डवर अनेक ठिकाणी क्रोमचा वापर करण्यात आला आहे. कारमधील इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला NEXAच्या स्वाक्षरीसह ब्लू कलर टोनमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारची ड्रायव्हिंग पोझिशन कमांडिंग आहे. कोणत्याही उंच व्यक्तीला ही कार चालवण्यात कोणताही त्रास होणार नाही. कारमध्ये टिल्ट- टेलिस्कोपिक स्टिअरिंग आणि अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीटसुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला कार ड्राइव्ह करणं सोपं जाणार आहे.

कारमध्ये गेल्या मॉडलसारखी इंफोटेनमेंट सिस्टीमही बसवण्यात आली आहे. यावेळी कारमध्ये अॅपल कार प्लेसह अँड्रॉइड ऑटो फीचरही देण्यात आले आहेत. तसेच नेव्हिगेशन आणि ब्लू टुथ कनेक्टिव्हिटीची सुविधाही दिली आहे. कारमध्ये बसवण्यात आलेले स्पीकर उत्तम दर्जाचे आहेत. यावेळी कारमध्ये मागच्या मॉडेलहून अॅडव्हान्स Apple carplay सोबत अँड्रॉइड ऑटोचीही सुविधा देण्यात आली आहे. आसन व्यवस्थाही चांगली आहे.

तसेच सीटचे कुशनिंगही आरामदायी आहे. रस्त्यावर ही गाडी चालवताना समाधान जाणवतं. कारमध्ये 353 लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात सामानही ठेवता येणार आहे. कारमध्ये स्टोरेजही दिलं आहे. Maruti Suzuki S Cross सर्व व्हेरिअंटमध्ये एबीएस, ड्युअल एअरबॅग्स आणि ISOFIX चाइल्ड माउंट सीटलाही सेफ्टी फीचर देण्यात आले आहे.
या टेक्नॉलॉजीचा वापर Maruti Suzuki Ciaz आणि Maruti Suzuki Ertigaमध्येही करण्यात आला आहे. SHVS टेक्नोलॉजीमुळे फ्युअल एफिशियन्सीही वाढली आहे. Maruti Suzuki S Cross ही डिझेल इंजिनच्या पर्यायसह बाजारात उपलब्ध आहे. यात 1.3 लीटर, डीडीआयएस 200 डिझेल इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 89 बीएचपीच्या पॉवर आणि 200 एनएमचा टॉर्क देण्यात आला आहे.
या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बसवण्यात आला आहे. तसेच मारुती लवकरच याचं पेट्रोल आणि ऑटोमॅटिक व्हर्जन लाँच करणार असल्याचीही चर्चा आहे.

कारचं इंजिन सुयोग्य पद्धतीनं टोन करण्यात आलं आहे. कंपनीनं यावेळी इंजिनच्या कामगिरीवरही लक्ष केंद्रित केलं आहे. 1800-1900 आरपीएमची इंजिन पॉवर देण्यात आली आहे. तसेच कारची स्पीड स्टॅबिलिटीसुद्धा चांगली आहे. 2017 Maruti Suzuki S Cross ही 4 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याची विक्री कंपनीची प्रीमियम डीलरशिप नेक्साच्या माध्यमातून केली जाते.

2017 Maruti Suzuki S Crossची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 8.61 लाखांपासून 11.32 लाखांपर्यंत आहे. या रिव्ह्यूमधून तुम्हाला आम्ही 2017 Maruti Suzuki S Crossच्या सर्व फीचरची माहिती दिली आहे. खरं तर नवी एस क्रॉस ही कार जुन्या एस क्रॉस कारच्या तुलनेत फारच चांगली आहे. त्यामुळे तुम्ही जर गाडी घेणार असाल तर तुमच्यासाठी 2017 Maruti Suzuki S Cross हा चांगला पर्याय आहे.

Web Title: Review: How is the new year 2017 Maruti Suzuki S Cross?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.