Motorola Christmas Offer: Motorola offers discounts for smartphones! | Motorola Christmas Offer: मोटोरोलाच्या स्मार्टफोन्स मिळणार सवलत! 

ठळक मुद्देख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन्सवर सवलत 30 डिसेंबरपर्यंत असणार ही ऑफर

मुंबई : मोबाईल मार्केटिंगमधील सर्वाधिक लोकप्रिय कंपनी मोटोरोलाने ग्राहकांसाठी काही स्मार्टफोन्सवर सवलतींची ऑफर आणली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सवर सेल आणला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहक मोबाईल स्टोअरसह मोटो हब आणि इतर कोणत्याही मोबाईल स्टोअरमधून स्मार्टफोन्स खरेदी करु शकतात. ही ऑफर फक्त 30 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहक मोटोरोलाचे लोकप्रिय स्मार्टफोन्स कमी दरात खरेदी करु शकतात. 

जाणून घ्या, सवलतीत कोणते स्मार्टफोन्स आहेत...
Moto Z2 Play : मोटोरोलाच्या या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. याची मूळ किंमत 27,999 रुपये आहे. या ऑफरमधून 24,000 रुपयाला मिळणार आहे. 5.5 इंच डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर आहे. तसेच, 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तर इंटरल मेमरी 64 जीबी आहे. 
Moto M 4G : मेटल डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनवर सुद्धा मोठी सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना मिळणार आहे. 5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 16 मेगाफिक्सलचा रिअर कॅमेरा आहे, तर 8 मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याची बॅटरी 3050mAh इतकी आहे. ज्यावेळी लाँच झाला त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये होती.  
Moto M 3G: या स्मार्टफोनवर सुद्धा दोन हजार रुपयांची सवलत दिली आहे. याची मूळ किंमत 13, 999 रुपयांची आहे. यामध्ये 11, 999 रुपयांत खरेदी करु शकतात. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे. तर, 32 जीबीची इंटरन मेमरी देण्यात आले आहे.   
याचबरोबर,  Moto G5S, Moto G5, Moto E4 आणि Moto C या स्मार्टफोन्सवर सुद्धा मोठी सूट ग्राहकांना मिळणार आहे.