मारुतीची सात सीटर वॅगन आर येणार; अर्टिगावर परिणाम होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:18 PM2019-05-08T15:18:25+5:302019-05-08T15:20:12+5:30

मारुती सुझुकीने नुकतीच Wagon R भारतीय बाजारात नव्या रुपात लाँच केली आहे. आता मारुती सात-सीटर Wagon R लाँच करणार आहे.

Maruti's seven seater Wagon R will come; Will ERTIGA affected? | मारुतीची सात सीटर वॅगन आर येणार; अर्टिगावर परिणाम होणार ?

मारुतीची सात सीटर वॅगन आर येणार; अर्टिगावर परिणाम होणार ?

googlenewsNext

मारुती सुझुकीने नुकतीच Wagon R भारतीय बाजारात नव्या रुपात लाँच केली आहे. आता मारुती सात-सीटर Wagon R लाँच करणार आहे. ही कार मारुतीच्या शोरुममधून नाही तर नेक्साच्या डिलरशीपमधून विक्रीस उपलब्ध केली जाईल. नेक्साद्वारे मारुतीच्या प्रिमिअम कारची विक्री केली जाते. मात्र, या कारच्या लाँचला विलंब होत आहे. याचे कारण म्हणजे Wagon R च्या विक्री मंदावल्याचे बोलले जात आहे. 


Maruti Suzuki ने यंदा जानेवारीमध्ये Wagon R लाँच केली होती. ही कार Heartect प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या कारला नवीन रुप देताना काही प्रमाणात कारचा आकार वाढविला आहे. ही कार जास्त प्रिमिअम कशी वाटेल याकडे कंपनीने लक्ष दिले आहे. मारुतीची कार असल्याने विक्री जरी जास्त असली तरीही जुन्या कारच्या तुलनेत कमी आहे. कारण बाजारातही सुस्ती आलेली आहे. 
या वॅगन आरची 7 सीटर कार आल्यास तिची विक्री जास्त होईल. या कारमध्ये मूळ कारपेक्षा जास्त फिचर्स देण्यात येतील. या कारला टक्कर देण्यासाठी रेनॉल्टची Triber MPV येणार आहे. 

मारुतीकडे सध्या सात सीटरमध्ये अर्टिगा ही कार आहे. मात्र, ही कार 8 लाखांच्या बाहेर जाते. यामुळे 7 लाखांपर्यंत ही कार असल्यास तिला जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. रेनॉल्टची Triber MPV भारतात एक किंवा दोन महिन्यांत लाँच होईल. या कारची एक्स शोरुम किंमत 5.5 लाख ते 8 लाख रुपये असेल. या किंमतीत मारुतीकडे सध्या कोणतीही कार नाही. यामुळे मारुतीची ही नवी कार पर्याय ठरणार आहे. 

मारुती या कारमध्ये 1.2 लीटरचे के सिरिजचे पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन 82 बीएचपीची ताकद देते. गिअरबॉक्स 5 स्पीड मॅन्युअल आणि अॅटोमॅटीक असणार आहे. तसेच ही कार भविष्यात हायब्रीड आणि इलेक्ट्रीक मध्येही येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Maruti's seven seater Wagon R will come; Will ERTIGA affected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.