Mahindra Alturas G4 Bookings Open, Launch Date Announced | महिंद्राच्या नवीन SUV Mahindra Alturas G4 गाडीचे बुकिंग सुरु 
महिंद्राच्या नवीन SUV Mahindra Alturas G4 गाडीचे बुकिंग सुरु 

नवी दिल्ली : महिंद्राने आपल्या नवीन  SUV Mahindra Alturas G4 गाडीची घोषणा केली आहे. तेव्हापासून मार्केटमध्ये याच गाडीची चर्चा होत आहे.  SUV Mahindra Alturas G4 गाडी 24 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. कंपनीने सध्या या गाडीचे बुकिंग सुरु केले आहे. नवीन  SUV ला कंपनीने एक वेगळे Alturas नाव दिले आहे.  
Mahindra Alturas G4 दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लाँच होणार आहे. लोअर-स्पेक G2 trim, 2WD आणि G4 4WD model असे दोन व्हेरियंट आहेत.  SUV मध्ये कंपनी 2.2 लीटर डिझेल इंजिन देत आहेत. हे इंजिन 180.5 एचपी पॉवरसोबत 450 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट करेल. याशिवाय यामध्ये मॅन्युअल गिअर बॉक्सचा ऑप्शन दिला आहे.  
Mahindra Alturas मध्ये मर्सिडीज सारखे सात स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स दिले आहेत. मॅन्युअल शिफ्टिंगवर चालणार आहेत. महिंद्रा कंपनीने  SUV ला फ्रेश लूक दिला आहे. त्यामुळे नवीन Rexton सारखी दिसते. तसेच, ग्रिलला महिंद्रा फॅमिली लूक दिला आहे. कंपनीने फ्रेम कंस्ट्रक्शनमध्ये काही बदल करण्यात आले असून अपग्रेड केले आहे. दरम्यान, महिंद्राची ही गाडी Alturas Toyota Fortuner आणि Ford Endeavour यासारख्या गाड्यांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. 

English summary :
Mahindra has announced the launch of its new SUV Mahindra Alturas G4. The SUV Mahindra Alturas G4 will be launched on November 24. The company has already started booking this car.


Web Title: Mahindra Alturas G4 Bookings Open, Launch Date Announced
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.