joint on bridge road is dangerous for vehicles | पुलांवरील सांधे पार करताना वाहनचालकांनी घ्यावी काळजी

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे रस्ते म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनचालकांना डोकेदुखीच आहे. विशेष करून दुचाकी, प्रवासी कार, रिक्षा अशा छोट्या व मध्यम आकाराच्या वाहनांचा विचार करता रस्त्यांवरून वाहन चालवणे म्हणजे खूपच दक्षतेने करावे लागणारे कर्म आहे, असे म्हणावे लागते. रस्त्यांमध्ये येणा-या पुलांवर असलेल्या रस्त्यांच्या पऋष्ठभागाचा विचार करता तेथील रस्ता जरी चांगला असला तरी एकंदर त्या ठिकाणी असलेल्या जोडभागावर नेहमीच दणके बसत असतात. यामुळे मोठी वाहने ज्या पुलांवरून जातात तेव्हा पूल ताकदक्षमता किती आहे ते पाहिल्यास या मोठ्या वाहनांच्या जाण्यायेण्यामध्ये पुलावरील जोड वा सांघा असलेल्या भागावरून जाताना बसणारा दणका पुलाचे आयुष्यकमी करणारा असतो, अनेकदा जाणवते. अर्थात हा विषय येथे आणण्याचे कारम की मोठ्या वाहनाला या सांध्याचा फार त्रास होत नसला तरी लहान वाहनांना तो त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे पुलावरून जाताना तेथील रस्त्यावर असणारे हे सांधे व त्यमुळे असणारा रस्त्यावरचा खड्डायुक्त भाग हा लहान व मध्यम आकाराच्या वाहनांना त्रासदायकच असतो.

अनेकदा राज्य वा राष्ट्रीय महामार्गावर लांब वा छोटा पूल गाड्यांना इतका दणके देणारा असतो, की अचानक पुलावर कार जाताच वेग कमी करावा लागतो, तेथील सांधेजोड अयोग्य पद्धतीने झालेली असते, तेथील डांबराचा भागही नीटपणे रस्ता म्हणून विचारात न घेता केलेला असतो.
 

पूल हा विशिष्ट पद्धतीने काही भागांमध्ये विभाजित करून तयार केलेला असतो. प्रत्येक भाग जोडलेला असतो त्या ठिकाणी रस्त्यावर आपल्याला सांधे असलेले दिसतात. काही पुलांवर ते दिसत नाहीत तेथे त्यावरच डांबरीकरणही केलेले दिसते. मात्र काही ब-याच पुलांच्या रस्त्यांवरून जाताना प्रत्येक सांध्यावरून वाहन जात असते, ते सांधे असलेल्या भागात रस्त्याचा भाग काहीसा खाली असल्याने वाहनाला तेथे धक्के बसत असतात. मोठ्या वाहनांना ते फार जाणवत नाहीत. तसेच एकंदर देखभालीचा प्रकार व रस्ते बनवतानाची दक्षता घेण्यामधील हेळसांड पाहिली तर या सांध्यावर दुचाकी, तीन चाकी, लहान आकाराच्या वा मध्यम आकाराच्या मोटारी नेताना धक्के जाणवतात. त्यात तेथे नीटपणे देखभाल नसल्याने पुलावरून वाहन चालवताना या सांध्याच्या ठिकाणी धक्के जाणवतात. यामुळे तुमच्या वाहना चालवण्यामध्ये त्रास होऊ शकतो. आधीचा रस्ता चांगला असेल व नंतर पुलावर आल्यानंतर अचानकपणे येणा-या या सांध्याच्या रस्त्यावर आल्यानंतर खड्ड्यासारखा धक्का जाणवतो. त्यामुळे तो खड्डा जास्त त्रासदायी असेल तर वाहना चालवताना अतिवेग असेल तर कदाचित नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या वाहनांचे स्स्पेंशन अशा प्रकारच्या रस्त्यामुळे ते सांधे उडवून लावण्याच्या तुमच्या प्रयत्नाने खराब होऊ लागते. सतत तशी सवय लागली तर सस्पेंशन, शॉक अॅब्सॉर्बर्स, स्प्रिंग्ज यावर त्याचा परिणाम होत असतो. कारच्या दरवाज्यांवरही, बिजागीरावरही परिणाम होत असतो. यासाठी तुमचे वाहन चालन तेथे सावधानतेने करावे हे उत्तम.