लवकरच येणार इंडियन मोटरसाइकलची दमदार बाईक, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:45 PM2018-10-02T16:45:38+5:302018-10-02T16:49:30+5:30

Indian Motorcycle ने आज आपली नवीन दमदार बाईक FTR1200 वरुन पडदा उठवला आहे. इंडियन मोटरसायकलने जर्मनीमध्ये होणाऱ्या 2018 INTERMOT मोटरसायकल शोमध्ये ही बाईक सादर केली आहे.

Indian motorcycle FTR 1200 unveiled in ntermot 2018 | लवकरच येणार इंडियन मोटरसाइकलची दमदार बाईक, जाणून घ्या किंमत!

लवकरच येणार इंडियन मोटरसाइकलची दमदार बाईक, जाणून घ्या किंमत!

Next

Indian Motorcycle ने आज आपली नवीन दमदार बाईक FTR1200 वरुन पडदा उठवला आहे. इंडियन मोटरसायकलने जर्मनीमध्ये होणाऱ्या 2018 INTERMOT मोटरसायकल शोमध्ये ही बाईक सादर केली आहे. अमेरिकन ब्रॅन्ड इंडियन मोटारसायकलची ही पहिली बाईक नॉन-क्रूजर मोटारसायकल आहे. चला जाणून घेऊ या बाईकची खासियत...

स्टायलिंग

FTR1200 ची स्टायलिंग कंपनीने Indian FTR750 फ्लॅट ट्रॅक रेसिंग बाईकपासून प्रेरित आहे. फ्लोइंग ट्रॅक, राऊंड एलइडी हेडलाईट, एक्सपोज्ड फ्रेम आणि स्टही टेल-सेक्शन या बाईकला फार अग्रेसिव्ह लूक देते. 

व्हेरिएंट

Indian FTR1200 दोन व्हेरिएंटमध्ये येणार आहे. यात स्टॅंडर्ड आणि  FTR1200 S यांचा समावेश आहे. स्टॅंडर्ड व्हेरिएंटमध्ये सिंगल पॉड सेमी-डिजिटल कंसोल देण्यात आलं आहे. या व्हेरिएंटमध्ये ४.३ इंचाची टचस्क्रीन टीएफटी डिस्प्ले आणि फोन कनेक्टिव्हीटी पर्याय आहेत. 

इंजिन

कंपनीचा दावा आहे की, FTR1200 चं इंजिन ८० टक्के नवीन आहे. तर इंजिनाचे बाकीचे भाग हे  Indian Scout मॉडेल सारखे आहेत. हे इंजिन  Indian Scout च्या इंजिनच्या तुलनेत हलकं आणि हायर कंप्रेशन रेश्यो असलेलं आहे. 

पॉवर

यात देण्यात आलेल्या 1203cc व्ही ट्विन इंजिन 8,250rpm वर 120hp ची पॉवर आणि 6,000rpm वर 112.5Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनला ६-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलंय. सोबतच स्लीपर क्लचची सुविधाही देण्यात आली आहे. FTR1200 मध्ये 19-इंचाचा फ्रन्ट व्हील आणि १८ इंचाचा बॅक व्हील दिला आहे. 

रायडिंग मोड

FTR1200S मध्ये स्पोर्ट, स्टॅडर्ड आणि रेन नावाने तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. यात एबीएस आणि आयएमयू-पॉवर्ड ट्रॅक्शन कंट्रोलही दिलं आहे. 

किंमत

Indian FTR1200 ची विक्री २०१९ च्या मध्यात अमेरिकेत सुरु होईल. या बाईकच्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत १२, ९९९ डॉलर म्हणजेच ९.५४ लाख रुपये आणि FTR1200 S ची किंमत १४,९९९ डॉलर म्हणजे ११ लाख रुपये आहे. भारतात या बाईकची विक्री २०१९ च्या मध्यात सुरु होईल. 
 

Web Title: Indian motorcycle FTR 1200 unveiled in ntermot 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.