भारतीय ग्राहकांनी बदलला स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल बाबतचा दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 06:00 PM2017-09-22T18:00:00+5:302017-09-22T18:00:00+5:30

एसयूव्ही म्हणजेच स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल या वाहनाबाबत जगात काही वेगळी परिमाणे असली, वेगळी दृष्टी असली तरी भारतीय ग्राहक काहीसा हटके व वेगळ्या अपेक्षेने पाहाणारा आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक सेदानकडूनही सहजपणे या एसयूव्हीकडे वळला आहे.

Indian consumers changed their attitude about sports utility vehicles | भारतीय ग्राहकांनी बदलला स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल बाबतचा दृष्टिकोन

भारतीय ग्राहकांनी बदलला स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल बाबतचा दृष्टिकोन

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिका, युरोप येथे एसयूव्हीबाबत असणारी संकल्पना नक्कीच तशी वेगळी होतीचासी असणारी, रफटफ व दणकट असणारी एसयूव्ही भारतात सुरुवातीला तशी होतीमात्र आज एसयूव्ही व एमयूव्ही यामधील अंतरच जणू पुसून गेले आहे

भारतीय ग्राहकाने स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयूव्ही (SUV) बाबतचा एकंदर दृष्टीकोन बदललेला दिसतो. त्यामुळे सेदान प्रकारची कार वापरणारे व त्याकडे एक प्रेस्टिज म्हणून पाहाणाऱ्या ग्राहकांचा एसयूव्हीकडे पाहाण्याची नजर खूप बदललेली आहे असे दिसते.एकेकाळी स्टेशनवॅगन या प्रकारातून जन्मास आलेली व लाइट मिनी ट्रक या संकल्पनेत तयार झालेली परदेशातील एसयूव्ही भारतात मात्र बदलत गेली. काळाप्रमाणे ग्राहकाच्या आवडीनिवडीप्रमाणे ती बदलली गेली. मोठ्या कार्पोरेट्सकडे असणारी सेदान जाऊन तो एसयूव्हीचा वापर करू लागला.

जगामध्ये विविध देशात विशेष करून अमेरिका, युरोप येथे एसयूव्हीबाबत असणारी संकल्पना नक्कीच तशी वेगळी होती. चासी असणारी, रफटफ व दणकट असणारी एसयूव्ही भारतात सुरुवातीला तशी होती. मात्र आज एसयूव्ही व एमयूव्ही यामधील अंतरच जणू पुसून गेले आहे. त्याचे आरेखन काहीसे बदलले आहे. चासीऐवजी मोनोकॉक पद्धतीच्या एसयूव्हीही आणल्या गेल्या आहेत. मुळात एसयूव्ही म्हटली की भारतीय कार उत्पादकांच्या सर्वसाधारण व्याख्येप्रमाणे १५०० सीसी इंजिन, १७० मिमि ग्राऊंड क्रीअरन्स व ४ मीटर लांब अशी वाहने युटिलिटी व्हेइकल म्हणून मानली जात आहेत.यापेक्षा जास्त ताकदीच्या एसयूव्हीही आहेत.

ताकदीबरोबरच कारसारखी आरामदायी किंबहुना अधिक स्पेशियस वा प्रशस्त आणि डिझेलवर चालणारी, लांबच्या प्रवासासासाठीही अतिशय चांगली मानली गेलेली एसयूव्ही गेल्या दहा वर्षांमध्ये उच्चभ्रू वर्गामध्ये लोकप्रिय झाली. वैयक्तिक, कार्यालयीन वा व्यावसायिक पेशातील उच्चपदस्थांसाठी तसेच त्यांच्या कौटुंबीक वापरासाठीही उत्तम अशी केली गेल्याने एसयूव्ही सेदानइतकीच या वर्गामध्ये लोकप्रिय ठरली. किंबहुना या एसयूव्हीकडे बघण्याची भारतीय ग्राहकांची नजर बदलली गेली आणि त्यातूनच एसयूव्हीचे बदलते रूप दिसू लागले.

शहरी वातावरणातही ती चांगली रुळणारी ठरली. एसयूव्हीची लोकप्रियता इतकी झाली की छोट्या कारमालकांनाही त्याची उपयुक्तता पटली, तिचा पिकअप, लांबवर जाण्यामध्ये असणारी एक प्रकारची झींग यामुळे तरुणांनाही ती आवडली.त्यामुळे कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या नव्या श्रेणीचाही जन्म झाला. भारतीय ग्राहक काहीवेळा जगातील अन्य ग्राहकांपेक्षा काहीसा वेगळा आहे, असे काही वेळा वाटते व पटते ते याचसाठी.

Web Title: Indian consumers changed their attitude about sports utility vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.