होंडाची नवी स्कूटर 'ग्राझिआ', शहरी ग्राहकांसाठी तयार केलं खास मॉडेल

By ऑनलाइन लोकमत on Fri, October 27, 2017 8:23am

होंडाने आता स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआ ही एक आकर्षक स्कूटर सादर करण्याचे योजिले आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ती प्रत्यक्ष हाती पडू शकेल, अशी अपेक्षा असताना सोशल मिडियावर तिची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.

अॅक्टिव्हाच्या निर्मात्या होंडा मोटारसायकल स्कूटर इंडिया या कंपनीकडून आता ग्राझिआ ही नवी स्कूटर भारतीय ग्राहकांसाठी सादर होणार आहे.लवकरच तिची नोंदणीही सुरू होणार असून विशेष करून शहरी भागासाठी आरेखित करण्यात आलेले हे देखणे मॉडेल, लोकांना किती आवडेल ते आता पाहायचे आहे.

१२५ सीसी क्षमतेच्या ताकदीचे इंजिन अॅक्टिव्हाचे असून स्कूटरसाठी असणाऱ्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआला सादर केले जात आहे. दोन हजार रुपये इतक्या रक्कमेवर ग्राझिआची नोंदणी सुरू केली जाणार आहे.

सध्याच्या अॅक्टिव्हाच्या विविध प्रकारांमध्ये ही आकर्षक ठरू शकेल, अशी अपेक्षा आहे. साहजिकच किंमतीतही फरक असून सुमारे ६५ हजार रुपये इतकी किंमत जाण्याची शक्यता आहे.

ग्राझिआची ठळक वैशिष्ट्ये

- इंजिन १२४.९ सीसी

- ४ स्ट्रोक

- फॅनकूल्ड एसआय इंजिन

- ८.५२ बीएचपी कमाल ताकद व ५००० आरपीएम

- टॉर्क १०.५४ एनएम

- वेगळी आकर्षक रचना

- बसण्यासाठी व स्टोरेजसाठी जास्त जागा

- कॉम्बी ब्रेक

- पुढील चाकासाठी डिस्क ब्रेक

- मोबाइलसाठी यूएसबी चार्जिंग पर्याय

संबंधित

प्रमाणपत्रासाठी आता आॅनलाइन अपॉइंटमेंट
जिल्हा न्यायालय परिसरातून वर्षभरात २० दुचाकी चोरीला
नाशिक शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच
वसमत रोडवर टँकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू
विनापासिंग वाहन चालकांकडून पाच वर्षांत ३६ लाखांचा दंड वसुल

ऑटो कडून आणखी

होंडाची ही कार ठरली सर्वात जास्त विकली जाणारी दुसरी कार
होंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!
Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत!
Review: कशी आहे नवीकोरी 2017 Maruti Suzuki S Cross?
सुझकीची 'ही' मोटरसायकल दोन लाखाने झाली स्वस्त

आणखी वाचा