Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:28 PM2018-09-24T16:28:50+5:302018-09-24T16:39:24+5:30

सध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे.

Ford Aspire Facelift to begin booking, will launch on 4th October | Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च

Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च

Next

नवी दिल्ली : फोर्ड इंडियाची सेदान कार Ford Aspire ने कात टाकली असून नवी फेसलिफ्ट येत्या 4 ऑक्टोबरला भारतात सादर केली जाणार आहे. सध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे. या कारची बुकिंगही सुरु करण्यात आले आहे.


फोर्ड इंडियाचे मार्केटींगचे उपाध्यक्ष राहुल गौतम यांनी सांगितले की, नवीन Ford Aspire अन्य कंपन्यांच्या कारपेक्षा वेगळी आहे. ग्राहकांना या कारमुळे वेगळा चालविण्याचा अनुभव मिळणार आहे. 11 हजार रुपयांमध्ये कार बुक करता येणार आहे.

अस्पायरच्या नव्या मॉडेलमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि नवे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. कारच्या केबिनमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. नवीन टचस्क्रीन इन्फोटेन्मेंटही यामध्ये देण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये अॅटो क्लायमेट कंट्रोल आणि स्टार्ट-स्टॉप बटन असणार आहे. 




फोर्डने अस्पायरच्या पेट्रोल मॉडेलमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन ड्रॅगन सिरिजचे इंजिन देण्यात येणार आहे. मात्र, डिझेलचे 1.5 लिटर इंजिन कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच जुन्या मॉडेलमधील गिअरबॉक्सही बदलण्याची शक्यता आहे.  सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत 20 हजार रुपयांनी किंमत अधिक असण्याती शक्यता आहे. 


अस्पायर ही कॉम्पॅक्ट सेदान कार  Maruti Suzuki DZire, Hyundai Xcent, Honda Amaze आणि Volkswagen Ameo ला टक्कर देणार आहे. 
 

Web Title: Ford Aspire Facelift to begin booking, will launch on 4th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.