धुक्यात, पावसात व कमी दृश्यमानतेमध्ये वाट दाखवणारे फॉगलाइट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:16 PM2017-09-20T21:16:21+5:302017-09-20T21:16:57+5:30

धुके किंवा पावसाळी वातावरणात रस्त्यावरील दृश्यमानता कमी असल्याने त्यावेळी ती अधिक वाढावी, यासाठी फॉगलाइट उपयोगी ्सतो. फॉगलाइट म्हणजे अतिरिक्त हेडलॅम्प नाही.

foglight is ment for for, not for put light beam on another vehicle | धुक्यात, पावसात व कमी दृश्यमानतेमध्ये वाट दाखवणारे फॉगलाइट

धुक्यात, पावसात व कमी दृश्यमानतेमध्ये वाट दाखवणारे फॉगलाइट

googlenewsNext

मुंबई, दि. 20 - विविध प्रकारच्या वातावरणात कार वा अन्य कोणत्याही प्रकारची मोटार जेव्हा रस्त्यावरून चालवावी लागते, तेव्हा कारचा हेडलॅम्प पुरेसा नसतो. रात्रीच्यावेळी वा दिवसाच्यावेळी असणारा धुक्याचा दाट पडदा किंवा पावसामध्ये मुसळधार धारांमुळे कमी होणारी दृश्यमानता, यामुळे कार चालवणे कठीण होते. विशेषतः ही वाहनचालनामध्ये असणारी स्थिती भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात कायम असते असे नाही. काही विशिष्ट मोसमामध्ये व वेळेमध्ये ती अनुभवण्यास मिळते. मात्र याचा अर्थ असा नाही की,फॉगलाइटची अशा वेळीच गरज असल्याने ते लावू नयेत. ते नक्कीच असावेत. त्याला काहीच हरकत नाही. फॉग लाइट हा एक प्रकारचा प्रकाशझोत असतो, इंग्रजीमध्ये आपण त्याला light beam असे म्हणू शकतो. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेचा भाग सुस्पष्ट दिसावा व समोरून येणाऱ्या वाहनाला व पुढे जात असलेल्या वाहनालाही आपल्या अस्तित्त्वाचे संकेत मिळावेत असा त्याचा हेतू असतो. 
भारतात अनेक वाहने अगदी छोट्या कारपासून मोठ्या बसपर्यंत, ट्रकपर्यंत फॉगलाइटचा वापर अनावश्यक पद्धतीने करताना दिसतात. रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या अप्पर लाइटला प्रत्युत्तर देण्यासाठी या फॉगलाइटचा अनावश्यक वापर केला जातो.साधारणपणे कारच्या बंपरमध्ये हे फॉगलाइट देण्याची पद्धत आहे. पूर्वी प्लॅस्टिकचे बंपर नसत तेव्हा ते बंपरवर स्वतंत्रपणे लावले जात, आजही काही कारमध्ये तशा प्रकारचे अतिरिक्त हेडलॅम्पसारखे ते वापरले जातात. हा फॉगलाइट ड्रायव्हरला रस्त्याची बाजू वा कडा, रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे संकेत हे लक्षात यावेत अशा दृष्टीने जुळवलेला असतो. त्यामुळे दुसऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरला त्रास होणार नाही, तो गोंधळणार नाही,यासाठी त्या फॉगलाइटचा प्रकाश डिप्परसारखा जमिनीवर प्रकाश झोत टाकणारा असावा, वा असतो. तसाच तो असावा. अतिरिक्तपणे लावलेला फॉगलाइट हा वरखाली करता येतो,त्यामुळे अनेक कारचालक तो लाइट समोरून येणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर कसा पडेल याचा विचार करतो. हे अतिशय चुकीचे आहे. पण भारतात कारच्या या प्रकारच्या लायइटिंगबाबत कोणीच फार गांभीर्याने घेत नाहीत. अशा प्रकारे अन्य ड्रायव्हरच्या डोळ्यावर लाइट मारणे हे घातक असते, हे कधी लक्षात घेतले जाणार हा प्रश्नच आहे. अशा प्रकारच्या वाहनविषयक व वाहनचालकविषयक छोट्या घटकांनाही प्रत्येक चालकांनी गंभीरपणे अनुसरले पाहिजे. फॉगलाइट हा तळातील बाजूला कारच्या पुढच्या बंपरवर खासकरून दिला जातो. सध्या तो विविध कार्सना ज्या पद्धतीने लावला आहे, खरे म्हणजे त्या फॉगलाइटचा काही उपयोग जाणवत नाही. कारच्या रचनेमुळे चालकाला त्या लाइटचा झोत दिसूनच येत नाही. तो नीट जुळवलेला दिसत नाही. जास्तीत जास्त ८ फुटांपर्यंत हा लाइट पडतो पण त्यामुळे कार चालवताना तो ड्रायव्हरच्या नजरेत येणे, त्याद्वारे त्याला रस्त्यांच्या स्थितीचे ज्ञान होणे व त्यानुसार त्याने कारवाई करणे, या क्रिया होईपर्यंत कार पुढे सरकलेली असते. अशामुळे कारच्या सध्याच्या फॉगलाइटच्या पोझिशनला काही अर्त उरत नाही. त्यासाठी काही लोक अतिरिक्त फॉग लाइट लावतात. धुक्याला भेदून जाणारे पिवळ्या रंगाचे लाइट हे फॉगलाइट म्हमून वापरले जातात. अर्थात तेही पुरेसे असतात असे नाही. धुक्याच्या दाट पडद्यामुळे रस्त्यावरील स्थिती नीट लक्षात येत नाही, खरे म्हमजे अनेकदा कार बाजूला लावणे सोयीस्कर असते. मात्र प्रवास गरजेचे असेल तर अतिशय नियंत्रित वेग व रस्त्याचा पूर्ण अंदाज घेत धुक्यामध्ये फॉगलाइटच्या सहकार्याने कार चालवावी. जास्त वेग हा अशावेळी अनावश्यक असतो. हा लाइट धुक्याला छेदत असल्याने त्याचे परावर्तन होऊन तो पुन्हा वाहनचालकाच्या डोळ्यावर येत नाही, त्यामुळे रस्त्यावरील स्थिती बऱ्याच प्रमाणात समजण्यास, आकलन होण्यास मदत होते. अर्थात फॉग लाइट म्हणजे अतिरिक्त हेडलॅम्प नाही, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

Web Title: foglight is ment for for, not for put light beam on another vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.