देशातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण; MG Motor चा भारतात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 08:24 PM2019-05-15T20:24:11+5:302019-06-27T22:06:16+5:30

भारतात आजच्या घडीला 16 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार कंपन्या आहेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे.

The first internet car unveiled; MG Motor's entry into India | देशातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण; MG Motor चा भारतात प्रवेश

देशातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण; MG Motor चा भारतात प्रवेश

मुंबई : भारतात आधीच 16 कंपन्यांच्या कार रस्त्यावर धावत असताना ब्रिटनच्या एका कंपनीने देशाच्या रस्त्यांवर पाऊल ठेवले आहे. MG (Morris Garages) Motor ने त्यांची Hector ही बहुप्रतिक्षित आणि इंटरनेट फिचरनी युक्त असलेली पहिली एसयुव्ही शोकेस केली आहे. मात्र, या कारची किंमत अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. येत्या जूनच्या सुरवातीला ही कंपनी कारची डिलिव्हरी सुरु करणार आहे. 


भारतात आजच्या घडीला 16 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार कंपन्या आहेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातच यंदा आणखी दोन कंपन्या भारतीय बाजारात भुरळ घालण्यासाठी येत आहेत. यापैकी एक एमजी मोटर्स आहे. या कंपनीने तरुण वर्गाला भुरळ घालण्यासाठी Hector ही कार आणली आहे. आज मुंबईमध्ये ही कार दाखविण्यात आली. 


या कारमध्ये 10.4 इंचाची HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही कार अॅमेझॉनच्या अॅलेक्सासारखे काम करणार आहे. अगदी एसी बंद, कमी - जास्त करण्यापासून ते पसंतीची गाणी ऐकवण्यापर्यंत ही कार कामे करणार आहे. ४८ व्होल्ट लिथियम-आयन बॅटरीद्वारे प्रतिष्ठित सौम्य-मिश्रित आर्किटेक्चर हे हेक्टरचे वैशिष्ट्य आहे.


एमजी मोटरने भारतातील 50 शहरांमध्ये 120 दालने उघडली आहेत. तसेच पुढील काही काळात हा आकडा 250 पार नेण्याचे सांगितले आहे. 


हेक्टर पेट्रोल आवृत्तीला १.५ लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन २५० एनएमच्या पीक टॉर्कवर १४३ पीएस शक्ती उत्पन्न करेल. आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात कार्यरत होईल. याचे २.० लिटर डिझेल इंजिन ३५० एनएमच्या पीक टॉर्कवर १७० पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल.

भारतीय रस्त्यांवर आणण्यासाठी ही एसयुव्ही ब्रिटनच्या एसयुव्हीपेक्षा वेगळी बनविण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 300 बदल करण्यात आले आहेत. 
 

Web Title: The first internet car unveiled; MG Motor's entry into India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.