Fear about car theft... don't worry 'lock' your car in just Rs 299 | कार चोरी होण्याची भीती सतावतेय...मग 299 रुपयांचे 'टाळे' ठोका
कार चोरी होण्याची भीती सतावतेय...मग 299 रुपयांचे 'टाळे' ठोका

मुंबई : कार नवीन असो वा जुनी, लग्झरी असुदे की साधी, आपली कार सर्वांनाच प्रिय असते. कार पार्किंगमधुनही चोरी केली जाते. नुकतीच एका स्वीपर म्हणून कामावर आलेल्या व्यक्तीने पार्किंगमधील कार चोरली होती. कार चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या कारचे पुढे काय होते हे माहित नसल्याने ती पुन्हा मिळवणे कठीण होऊन जाते. ही कारचोरी रोखण्यासाठी एक लॉक येते, जे चोरट्याने कारची काच फोडली, डायरेक्ट करून कार सुरु जरी केली तरीही ती पुढे नेण्यास रोखणार आहे. 


कार पुढे नेण्यासाठी गिअर महत्वाची भुमिका बजावतात. यामुळे गिअरबॉक्सलाच लॉक करणे शक्य होणार आहे. या गिअर लॉकची किंमत 299 रुपयांपासून सुरु होते. गुणवत्तेनुसार या लॉकची किंमत 3 हजार रुपयांपर्यंत जाते. 


हे गिअर लॉक एका किटमध्ये येते. ज्याला गिअर बॉक्सवर लावले जाते. किटमध्ये एक हँडल दिला जातो, ज्याला गिअरमध्ये अडकवून किटसोबत लॉक केले जाते. जर कोणी चोर गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये आला आणि गाडी सुरु जरी केली तरीही गिअर टाकू शकणार नाही. यामुळे गाडी एक इंचही पुढे जाऊ शकणार नाही. 

लहान मुलांपासुनही सुरक्षा...
काहीवेळी लहान मुले कारमध्ये घरातील चावी तुमच्या नकळत घेऊन जातात. म्युझिक प्लेअर, हॉर्न सुरु करण्यासाठी चावी कारला लावतात. मात्र, बऱ्याचदा खेळता खेळता कार सुरुही करतात. अशावेळी गिअर पडल्यास अपघात होण्याचा धोका असतो. यापासूनही बचाव करता येणार आहे. 


Web Title: Fear about car theft... don't worry 'lock' your car in just Rs 299
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.