ही आहे जगातील सर्वाधिक वेगवान कार, धावते ताशी 482 किलोमीटर वेगाने!

By ऑनलाइन लोकमत on Mon, November 06, 2017 6:06pm

अमेरिकेतील लास वेगासमध्ये सेमा ऑटोमोटिव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक कार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अमेरिकेतील नामांकित कार कंपनी हेनेसीने आपल्या सर्वाधिक वेगवान वेनम एफ5 कारचे (Hennessey Venom F5 ) प्रात्यक्षिक दाखविले. 

लास वेगास : अमेरिकेतील लास वेगासमध्ये सेमा ऑटोमोटिव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक कार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अमेरिकेतील नामांकित कार कंपनी हेनेसीने आपल्या सर्वाधिक वेगवान व्हेनम एफ5 कारचे (Hennessey Venom F5 ) प्रात्यक्षिक दाखविले. 

नवीन डिझाईन आणि स्टाईलवाली या हायपरकारला हेनेसी कंपनीने जगातील सर्वाधिक वेगवान कार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जगातील सर्वाधिक वेगवान म्हणून कार कोएनिगसेग अगेरा आरएस आहे. ही कार जास्तीत जास्त ताशी 444.6 किलोमीटर वेगाने धावते. तसेच, या कारची गिनिज बुकात नोंद करण्यात आली आहे.

तर, हेनेसीने आयोजित शोमध्ये हेनेसी व्हेनम एफ5 जगातील सर्वाधिक वेगवान कार असल्याचे म्हटले आहे. तसेच, हेनेसी व्हेनम एफ 5 या कारचा वेग ताशी 482 किलोमीटर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. हेनेसी कंपनीने या कारला हलकी कार्बन फायबर बॉडी दिली आहे.

तसेच, कारला नवीन लुक आणि खास टायर वापरले आहेत. ट्विन टर्बो व्ही8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जबरदस्त असून 1600 बीएचपी इतक्या क्षमतेची पॉवर निर्माण करु शकते. 

दरम्यान, हेनेसी व्हेनम एफ 5 कार जगातील फक्त 24 युनिटमध्ये बनविण्यात आली आहे. या कारची किंमत 1.6 मिलीयन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतात 10 कोटी 34 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. 

संबंधित

Children's Day: अभिनेता सैफकडून तैमुरला खास भेट, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !
कारच्या अंतर्गत कप्प्यांचा बहुमोल उपयोग
महाराष्ट्रातील 27 आरटीओमध्ये वाहनांची फिटनेस टेस्ट बंद
टोल नाक्यावर पुढे जाण्याच्या उतावळेपणाला आवर घाला
डॅशबोर्ड म्हणजे हलके सामान ठेवण्यासाठी असलेली जागा नव्हे

ऑटो कडून आणखी

ड्रायव्हिंग फटिग टाळण्यासाठी काय काय कराल ?
समजून घ्या कारमधील विविध कामांसाठीच्या 'स्विचेसच्या कळा', स्विचेच करतात महत्त्वाचे काम
टोल नाक्यावर पुढे जाण्याच्या उतावळेपणाला आवर घाला
डॅशबोर्ड म्हणजे हलके सामान ठेवण्यासाठी असलेली जागा नव्हे
होंडाची नवी स्कूटर 'ग्राझिआ', शहरी ग्राहकांसाठी तयार केलं खास मॉडेल

आणखी वाचा