विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:23 PM2018-11-14T17:23:35+5:302018-11-14T17:24:15+5:30

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे.

Electric Alto, Wagon R available; Will get speed of 210 km | विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

Next

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे. सर्वाधिक खपाच्या दोन कार अल्टो आणि वॅगन आर या आता विजेवर चालणार आहेत. मात्र, या कार मारुती सुझुकी नाही तर एक स्टार्टअप कंपनी विकणार आहे. धक्का बसला ना, खरे आहे. 


इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. मात्र, लोकांनी या कार महागड्या असणार असल्याने धास्ती घेतली आहे. यामुळे अल्टो आणि वॅगनआर सारखी खिशाला परवडणारी कार जर विजेवर चालणारी असेल तर त्यांना दिलासा मिळणार आहे. 
या दोन्ही कार पेट्रोलवर चालणाऱ्या कार आहेत. तेलगानाच्या E-trio Automobiles या स्टार्टअप कंपनीने मारुतीची आणि एआरएआयची परवानगी घेऊन दोन्ही कार विजेवर चालण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे सध्याच्या कारचे काय होणार हा प्रश्नही काहीसा निकाली निघाला आहे. E-trio ही ARAI ची मान्यता मिळालेला पहिली कंपनी आहे. 

E-trio ही कंपनी सध्याच्या IC इंजिन वाल्या कारवर काम करत आहे. यामुळे महागड्या इलेक्ट्रीक कार घेण्यापेक्षा वाहनमालक त्यांच्याकडील वापरातील कारमध्ये आवश्यक बदल करून विजेवर चालवू शकणार आहेत. 


सध्या ही कंपनी Alto आणि WagonR या कारला विजेवर चालविण्याची सेवा देत आहे. या कारची दोन वर्षांपासून चाचणी सुरु आहे. E-trio ने सांगितले की या वाहनांना गिअरची गरज राहत नाही. रेट्रोफिट किट बसविल्यानंतर या कार 150 किमीच्या वेगाने धावतात. चाचणीवेळी या कारनी तब्बल 210 किमीचा वेग पकडला होता. 


अल्टो आणि वॅगन आरवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनी अन्य कंपन्यांच्या कारना विजेवर चालविण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहे. या कंपनीची सध्या दर महिन्याला 1000 कार रेट्रोफिट करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षी हा आकडा 5000 करण्यात येणार आहे. 

Web Title: Electric Alto, Wagon R available; Will get speed of 210 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.