टोल नाक्यावर पुढे जाण्याच्या उतावळेपणाला आवर घाला

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 28, 2017 4:37pm

टोल नाक्यावर वाहनांची असणारी गर्दी पाहिली तरी लोक कंटाळा करतात, मात्र तरीही सहनशक्तीने टोलनाक्यावर शिस्तबद्धपणे वाहन चालवा. एकाच रांगेत राहून पुढे सरका मात्र घाई करू नका. त्यामुळे अपघात नक्कीच टाळता येतील.

भारतामध्ये आता टोल नाके हे बहुतांशी अनेक ठिकाणी नित्याचेच झाले आहेत कार, बस, ट्रक, यांच्या वाढत्या संख्येमुळे टोल नाक्यांवर असणारी टोल भरण्यासाठीची गर्दी व लांबचलांब असलेल्या रांगा ही अनेकांची डोकेदुखी झालेली आहे. हे वास्तव आहे, मात्र त्या वास्तवाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी सहनशक्ती याशिवाय उपाय नाही.

अनेक ठिकाणी टोल चुकवणअयासाठी वाहनचालक अयोग्य मार्ग अनुसरतात तर त्यापेक्षा आणखी वेगळा प्रकार घडतो तो टोल नाका झटपट पार कसा होईल व रांगेमध्ये वेळ चाळता कसा येईल, यासाठी असलेल्या काही वाहनचालकांच्या उतावळेपणाचा, अतिशहाणपणाचा व आपले वाहन पुढे दामटण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळे भांडणे व मारामाऱ्यांचे प्रकार घडतात. तसेच त्याहूनही आणखी दोकादायक प्रकार आढळून येतो, तो म्हणजे टोल नाक्यावर येण्याआधी समोरच्या रांगामध्ये कोणती रांग कमी आहे, ते पाहून त्या ठिकाणी अचानक आपली गाडी वळवून तेथे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या आततायी वाहनचालकांचा. 

अशा प्रकारांमुळे अपघातही झाल्याची उदाहरणे भरपूर आहेत. ती लक्षात घेता व त्यामुळे मनुष्यहानीही झालेली लक्षात घेता टोल नाक्यांवर अशा प्रकारचा आततायीपणा करू नये. काही झाले तरी टोल भरायचा आहे. मात्र त्यासाठी वेळ जाणार असला तरी चालेल मात्र त्यापायी प्राणावर बेतणार असेल वा वाहनाचे, टोलनाक्याचे नुकसान होणार असेल तर अशी कृती करणे केव्हाही अयोग्य.

टोल नाक्यावर जाताना... - सुरुवातीलाच आपली रांग नीट धरा. - टोलनाक्यावर रांग तोडू नका. - वाहनाचा वेग अतिशय कमी ठेवा. - हळूहळू पुढे सरकत असल्यास ती गती ठेवा. - कार शक्यतो पहिल्या गीयरमध्ये असावी. -रात्रीच्यावेळी अप्पर ठेवू नका. - हॅण्डब्रेकचाही वापर करा. - तेथील स्पीडब्रेकर नीट लक्षात घ्या. - विनाकारण हॉर्न मारू नका. - सुटे पैसे तयार ठेवा. - चालकाच्या उजव्या बाजूला पैसे घेणारा असल्यास उत्तम. - टोलनाक्यावरील रेषांचा अर्थ लक्षात घ्या. - सुरुवातीपासून एकच रांग धरा. - अचानकपणे दुसऱ्या रांगेत जाण्याचा प्रयत्न नको. - तेथील बॅरिअर्स सांभाळा. - पुढील वाहनाला फॉलो करा. - गर्दी असेल म्हणून चालकाने बाहेर पडू नये. - योग्य रांगेत जा. - दुसऱ्या रांगेत घुसू नका.

संबंधित

पिंपरीत वादळीचर्चेनंतर वाहनतळ धोरण मंजूर
जेलमधून सुटताच पुन्हा चोरली दुचाकी; पोलिसांनी साथीदारासह ठोकल्या बेड्या 
डीएसकेंच्या जप्त आलिशान गाड्यांचा होणार लवकरच लिलाव
बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू 
वकिलांच्या वाहनांवर झळकताय कलमांचे चॉइस नंबर

ऑटो कडून आणखी

BMW X3 भारतात लॉन्च, 50 लाखांपासून पुढे किंमत
Volkswagen Ameo TDI DSG : चकाचक लूक अन् टकाटक परफॉर्मन्स
अरे बापरे! ही आहे जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, या किंमतीत आल्या असत्या 4,500 गाड्या
उन्हाळ्यात अशाप्रकारे घ्या तुमच्या कारची काळजी
Ford च्या या नव्या कारची बुकिंग सुरू, जाणून घ्या कधी होणार लॉन्च!

आणखी वाचा