Claim the police after the police complaint than the settlement of loss after the accident | अपघात झाल्यानंतर नुकसानाच्या सेटलमेंटपेक्षा पोलीस तक्रारीनंतर विमा दावा करा
अपघात झाल्यानंतर नुकसानाच्या सेटलमेंटपेक्षा पोलीस तक्रारीनंतर विमा दावा करा

अनेकदा अपघात घडतात. त्यात कोणी जखमी होत नाही, की कोणी मरतही नाही. मात्र कारचे नुकसान मोठे वा छोटेही होत असते. मुळात अपघात व विमा दावा वा विम्याचा फायदा नेमका काय आहे ते नेहमी विमा काढण्यापूर्वी समजून घ्या. अपघातामध्ये व्यक्ती जखमी होणे, जबर जखमी होणे, मरण पावणे अशा प्रकारचा भीषण अपघात असेल तर तुम्ही ती घटना दाबून टाकू शकत नाही. पोलीस कारवाई अशावेळी होतेच.मात्र अनेकदा असे अपघात होत असतात, की त्यात तुमच्या कारचे वा दुसर्या वाहनाचे नुकसान होते वा ते कमी होत असते. म्हणजे एका वाहनाचे कमी नुकसान होणे वा न होणे किंवा दोन्ही वाहनांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान होणे, असा प्रकार होतो. मात्र अनेकदा दोन्ही अपघातग्रस्त बाजू थेट विमा दावा करून काहीवेळा दावा स्वतंत्रपणे करून मोकळ्या होतात. हे सेटलमेंट समजू शकते मात्र अनेकदा एखाद्या वाहनाचे अधिक नुकसान होते, मात्र दुसरे वाहन नुकसान न होताही अरेरावीची भाषा करतात. किंवा सामंजस्य करतो वा तडजोड करू असे सांगतात. अनेकदा वाहनाचे नुकसान नेमके किती व काय झाले आहे, याची पूर्ण कल्पना त्यावेळी येत नाही. येऊही शकत नाही, कारण त्यामध्ये प्रत्येकजण काही तज्ज्ञ नसतो वा व्हॅल्यूएशन करणारा नसतो. मात्र अशावेळी तडजोड प्रत्यक्षात करताना मात्र घटनेला जबाबदार असणारी व त्यालाही ती जबाबदारी आपली आहे हे माहिती असते मात्र तो काही ना काही खोट्यात असतो, तेव्हा वेळ मारून नेतो,नंतर रक्कम द्यायची टाळाटाळ करतो. यामध्ये वेळ निघून जाते. अपघातग्रस्त वाहनाच्या मालकाला वेळ घालवून अखेर स्वतःच्या विम्यामधून कारचे काम करून घ्यावे लागते. ज्याच्या चुकीमुळे अपघात होतो, तो मात्र निश्चिंत असतो. त्याला तसूभर काही त्रास सहनही करावा लागत नाही. 
असे प्रकार अनेकदा घडत असतात मात्र त्यावेळी अज्ञानापायी, भीतीपायी, पोलीस मदत करत नाहीत या शंकेपायी, वेळ अधिक जाईल या भीतीपायी चूक नसणाऱ्या वाहनाच्या मालकाला मात्र सारा भुर्दंड सोसावा लागतो. विमा त्याचा चांगला असेल तर त्याला त्याच्या दाव्यानुसार नकसानही भरून मिळते. मात्र जर त्याचा विमा परिपूर्ण खर्च देणारा ज्याला आज झीरो डेप्रीसेशन म्हणतात तो नसला तर मात्र बराच खर्च सोसावा लागतो. त्यात वेळही जातो, मनस्तापही होतो. यासाठीच अपघात झाल्यानंतर कधीही विनाकारण तडजोड करू नका. पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवा, तुमचे म्हणणे मांडा, त्या दुसऱ्या वाहनाबाबत दोष वा तक्रार असले तरीही ती नोंदवा. तुमचा वेळ जाणार आहे पण त्याची चुकी असतानाही त्याचा वेळ तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न कशाला करायचा असा सुस्पष्ट व व्यवहारी विचार करून पोलीस तक्रार नोंदवा. किमान अपघाताची नोंद तरी नीट राहील. पंचनामाही नीट करून घेता येईल. त्यासाठी तोपर्यंत तुम्हाला संबंधित तज्ज्ञाशी वा तुमच्या गॅरेज चालकाशी संपर्कही साधता येईल. तसेच अनेकदा असेही असते, की समोरचा तडजोड करू सांगणारा वाहन चालक कायदेशीरदृष्टीनेही चुकीचा, असू शकतो. त्याच्याकडे कारची कागदपत्रे नसणे, वाहनचालकाकडे योग्य परवाना नसणे, त्याच्या वाहनामध्ये काही बेकायदेशीर बाब असणे अशा अनेक बाबी त्यामुळे उघडकीसही येऊ शकतात. त्यावरही तुमची नजर असणे गरजेचे आहे. अर्थात त्यासाठी तुम्ही नेहमी स्वतःचे वाहन जोपासतानाही नीट काळजी घेणे, सारे कायद्यात बसेल असे पाहाणे गरजेचे असते. एक मात्र खरे की, अपघाताच्यावेळी तुमची चूक नसेल तर वा तुम्हाला त्याबद्दल खात्री असेल तर किंवा नसली तरीही पोलीस तक्रार दाखल केल्याशिवाय समोरच्या वाहनचालकाच्या समोर तडजोडीची भाषा अजिबात करू नका. किंबहुना ते योग्यही नाही. प्रत्येकाने हे केल्यास अनेकदा विमा कंपन्यांचे कारभारही तुम्हाला कळतील व त्यामुळे विमा कंपन्या, पोलीस, संलग्न यंत्रणा या देखील सुधारण्यास मदत होईल.त्यांच्यावर एक प्रकारे काम व कर्तव्याचा दबावही राहील. कारण तुम्ही त्या विषयामध्ये लक्ष घातल्याने हे सारे शक्य होऊ शकेल. अन्यथा 'चलता है ' म्हणून सारेच 'आलबेल' वाटावे, अशी स्थिती आहे.


Web Title: Claim the police after the police complaint than the settlement of loss after the accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.