...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

By हेमंत बावकर | Published: September 24, 2018 02:17 PM2018-09-24T14:17:46+5:302018-09-24T14:20:45+5:30

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात.

car will take care of you when.... | ...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

Next

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. यामुळे गाडीच्या देखभालीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. बऱ्याचदा गाडीही आपल्याला संकेत देत असते. मात्र आपण त्याकडे जाणते-अजाणतेपणी दुर्लक्ष करतो. पहा काय घ्यायची काळजी.

इंजिन ऑईल
वाहनाचे हृदय म्हणजे त्याचे इंजिन. त्याच्या आतील पिस्टनना कार्य करण्यासाठी वंगन म्हणून इंजिन ऑईल असते. प्रत्येक कंपनीचा त्या इंजिन ऑइलच्या ग्रेडनुसार बदलण्याचा कालावधी असतो. कंपनीने दिलेले किलोमिटर जरी पार झाले नसले आणि वर्षाचा कालावधी संपला तर ऑईल बदलावेच. कारण ते ऑइल ठराविक कालावधीनंतर ‘डिसग्रेड’ म्हणजेच खराब व्हायला सुरुवात होते. यामुळे प्रवासावेळी ऐन वेगात असताना इंजिन गरम होऊन रस्त्यातच वाहन बंद पडण्याचे प्रकार होतात. याचा कुलंटवरही परिणाम होतो आणि वाहन रस्त्यातच थांबल्यास अपघातही होण्याची शक्यता असते. उष्णतेवरही कुलंटचे आयुष्य असते. जास्त उष्णतेच्या ठिकाणी कुलंट लवकर खराब होते. 

व्हील अलाइनमेंट
वाहनाचा मोठा खर्च असतो तो म्हणजे टायरचा. ३० हजार किमी टायर चालतो. मात्र, या टायरची नीट काळजी न घेतल्यास प्रवासावेळी टायर फुटणे, पंक्चर होणे, अवेळी झीज झाल्याने ब्रेक न लागणे अशा घटना घडतात. यासाठी वेळोवेळी टायर अदलाबदली, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग करणे गरजेचे असते. तसेच टायरची हवा वेळोवेळी तपासणे आवश्यक असते. उपलब्ध असल्यास नायट्रोजन गॅस भरावा.

वाहन नेहमी  चालत नसल्यास
बऱ्याचदा वाहने सावलीखाली किंवा उन्हात आठवडा आठवडा धूळ खात उभी केलेली असतात. वाहनाचे वजन टायरच्या एकाच भागावर पडल्याने हवा कमी होत राहते. त्यामुळे टायरला गोल कातरे(भेग) पडतात. हवेचा दाब नीट ठेवावा लागतो. वायपर काचेवरच न ठेवता ते उभे करून ठेवावे. वातावरणातील बदलांमुळे वायपरचे रबर टणक होऊ लागतात. यामुळे काचेवरील धूळ काढण्याऐवजी ते काचेवर ओरखडे काढतात.

ब्रेक ऑईल
वाहन थांबण्यासाठी ब्रेक प्रणाली चांगली असावी. त्यामुळे ब्रेक पॅड वेळच्यावेळी बदलण्याबरोबरच ब्रेक फ्लुएड किंवा ऑईलही बदलणे गरजेचे असते. वाहन सारखेच वाहतूक कोंडी किंवा ब्रेक लावावे लागणाऱ्या भागात फिरत असल्यास वेळचेवेळी लक्ष द्यावे.

इंडीकेटर
वाहनाचे इंडिकेटर दिवसा व रात्रीही गरजेचे असतात. लाईट, डावा-उजवा इंडिकेटर सुरु आहे का, याची तपासणी वेळोवेळी करावी. तसेच ब्रेकलाईट लागते का याचीही तपासणी करावी.

Web Title: car will take care of you when....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.