ठळक मुद्देशोफर गाडी चालवतो आणि मालक त्याला मागून कुठे जायचे, कसे जायचे ते सांगतो पूर्वी एसटीमध्ये चालकाशी तो बस चालवताना बोलू नये, तसे करणे वाहन कायद्यांतर्गत गुन्हा आहे, असे काहीसे लिहिलेले असायचेड्रायव्हरला विचलीत करणारे काही बोलणे वा वर्तन करणे, अयोग्य शब्द बोलणे असे सारे प्रकार हे बॅक सीट ड्रायव्हरसारखेच झाले आहेत

उंटावरून शेळ्या हाकणे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशा प्रकारच्या काही म्हणी मराठीत आहेत.   काहीसा तशाच प्रकारचा एक वाक्प्रचार ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात आहे. तो म्हणजे बॅक सीट ड्रायव्हर... 

शोफर गाडी चालवतो आणि मालक त्याला मागून कुठे जायचे, कसे जायचे ते सांगतो. त्यावरून मूळ कल्पना आली असली तरी खरा अर्थ ड्रायव्हरला सूचना देऊन हैराण करणे, कार कशी चालवावी, काय चुकत आहेस आदी बाबींवर टीका टिप्पणी करणे अशी व्यक्ती ही बॅक सीट ड्रायव्हर म्हणून ओळखली जाते. खरे म्हणजे मागच्या आसनावर शोफर नाही तर मालक बसतो, त्या मालकाला उद्देशून हा वाक्प्रचार जरी तयार झाला असला तरी त्याचा खरा अर्थ मात्र वेगळा आहे. तो हा असा. की स्वतः ड्रायव्हिंग न करता काही लोकांना ड्रायव्हिंग कसे करावे, ते ड्रायव्हरला सागण्याची असणारी सवय वा अनावश्यक सल्ला देणे. खरे म्हणजे असे सल्लेही देऊ नयेत. मुळात चालकाचे वाहन चालवताना चित्त एकाग्र असले पाहिजे, जर त्याला कोणी अनावश्यक सल्ले दिले तर त्याच्या संतापाचा पारा चढू लागतो, त्यावेळी वाहनावरचा ताबाही सुटू शकतो. पूर्वी एसटीमध्ये चालकाशी तो बस चालवताना बोलू नये, तसे करणे वाहन कायद्यांतर्गत गुन्हा आहे, असे काहीसे लिहिलेले असायचे. चालकाचे चित्त एकाग्र  असावे यासाठी हे सारे असाव. 

आजही अनेक बॅक सीट ड्रायव्हर चालकाच्या शेजारी बसून सल्ले देत असतात. खरे म्हणजे टॅक्सीवाल्याला रस्ता सांगणे, कुठे वळ ते सांगणे किंवा शोफरला त्याबाबत सूचना देणे इतपर्यंत ठीक असते. खरा तो मूळ अर्थ आहे. कारण त्या 19 व्या शतकात मोटारीचा वापर सुरू झाल्यानंतर शोफरला सांगणारा मालक हा तितकेच अंतर राखून असे.. मात्र नंतर त्याचा अर्थ बदलला... त्यामुळेच  बॅक सीट ड्रायव्हर हा काही आता मागेच नव्हे तर पुढच्या आसनावरही असतो. त्या वाक्प्रचाराचा रुढार्थ वेगळा झाला आहे.. तसे होऊ नये. ड्रायव्हरला त्याच्या शांत चित्त राखण्यास प्रवासी वा मागे बसलेल्यांनी मदत करावी. यासाठीच मोबाइलवर बोलणे, जास्त आवाजातील गाणी लावणे, मागे बसलेल्यांनी चर्चा करताना ड्रायव्हरला विचलीत करणारे काही बोलणे वा वर्तन करणे, अयोग्य शब्द बोलणे असे सारे प्रकार हे बॅक सीट ड्रायव्हरसारखेच झाले आहेत. ड्रायव्हरच्या हातात प्रवाशांचे, स्वतःचे, पादचारी वा अन्य वाहनांमधील व्यक्ती यांचेही प्राण अवलंबून असतात. यामुळेच नेहमी बॅक सीट पॅसेंजर व्हावे पण बॅक सीट ड्रायव्हर नक्कीच होऊ नये.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.