ठळक मुद्देदुचाकी चालवणे कदाचित सोपे वाटेल पण ती योग्य पद्धतीने पार्क करणे हे सोपे नाही. शहरांमध्ये विशेष करून मुंबई पुण्यासारख्या मतहानगरांमध्ये दुचाकींचे प्रमाण इतके वाढले आहे की रस्त्यावर व अगदी राहात्या ठिकाणी दुचाकी पार्किंगसाठी सुरक्षितपणे ती पार्क करणे महत्त्वाचे आहे.

दुचाकी चालवणे कदाचित सोपे वाटेल पण ती योग्य पद्धतीने पार्क करणे हे सोपे नाही. शहरांमध्ये विशेष करून मुंबई पुण्यासारख्या मतहानगरांमध्ये दुचाकींचे प्रमाण इतके वाढले आहे की रस्त्यावर व अगदी राहात्या ठिकाणी दुचाकी पार्किंगसाठी सुरक्षितपणे ती पार्क करणे महत्त्वाचे आहे. रस्ता, घर वा सोसायटी, रेल्वे स्थानक परिसर, चित्रपटगृह, बाजार अशा विविध ठिकाणी दुचाकी पार्क करायचे प्रसंग येतात. अशा ठिकाणी गाडी पार्क करताना विविध प्रकारची काळजी घेणे तुमच्या स्वत:च्या, वाहनाच्या व दुसऱ्यांच्या वाहनासाठीही तुमचे पार्किंग नीट असले पाहिजे. 

दुचाकी स्टँडला लावणे सोपे नाही. अगदी साईडस्टँडला लावणेही हे एक कौशल्य आहे. दुचाकीच्या वजनाचाही अंदाज घेणे महत्त्वाचे असते. जमीन खड्डे असणारी, उताराची असेल तर भौमितिक रचना लक्षात घेऊन ती पार्क करता आली पाहिजे. अन्यथा स्कूटर वा मोटारसायकर तुमच्याच अंगावर येण्याची वा कलंडून पडण्याचीही शक्यता असते. गुळगुळीत जमिनीवरही स्टँडवर लावताना काळजी घ्यावी लागते. सेंटर स्टँडवर दुचाकी लावताना जमीन गुळगुळीत असेल तर दुचाकी सरकण्याचीही भीती असते. अशावेळी स्टँडवरही तुमच्या पायाचे वजन व अँगल नीट ठेवावा लागतो. जशी तुम्ही तुमची काळजी घ्याल तसा इतरांचाही विचार करा. त्यासाठी काही मुद्दे जरूर लक्षात ठेवा 

ठळक मुद्दे 
- रस्त्याच्या बाजूला पार्किंग परवानगी असेल तरच पार्क करा. 

- एखाद्या जाण्यायेण्याच्या रस्त्यात अडचण होईल असे पार्क करू नका. 

- हॅण्डललॉक गरज असेल तर करा. 

- रस्त्यावर कारमागे पार्क करताना योग्य अंतर ठेवा. कारचालकाला कार मागे घेऊन पार्किंगमधून बाहेर काढता आली पाहिजे.

अन्यथातुमच्या दुचाकीचेही नुकसान होऊ शकते. 

- रस्त्याला आडवी वाहन पार्क करण्याच्या रचनेत दुचाकीचे तोंड रस्त्याकडे असूद्या. 

- दुचाकींच्या पार्किंगमध्ये एकमेकांना चिकटतील असे पार्किंग टाळा. 

- पार्किंग बंद म्हणजे नो पार्किंग असेल तर तेथे पार्क करू नका. 

- पार्किंगचा वापर करताना वादविवाद टाळा. 

- पार्किंगमधून बाहेर पडताना थेट दुचाकी सुरू करू नका. 

- आरसे जुळवून घ्या, गीयर तपासा, सारे ठीक आहे त्याची खात्री करा मग पार्किंगमधून बाहेर पडा. 

- पार्किंग करताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.