ठळक मुद्देसस्पेंशनमुळे सर्वसाधारण मोटारसायकलींच्या तुलनेत २८ टक्के कमी हादराइंजिन - सिंगल सिलिंडर, २ व्हॉल्व, डीटीएसआय ExhausTEC सह, १०२ सीसी

बजाज ऑटोने प्लॅटिना या त्यांच्या जुन्या मोटारसायकल ब्रॅण्डला पुन्हा नव्याने उजाळा दिला आहे. प्लॅटिना कम्फर्टेक या १०० सीसी ताकदीच्या मोटारसायकलीचे त्यांनी नुकतेच सादरीकरण केले. भारतीय ग्राहकांसाठी अगदी खेड्यापाड्यातील खडकाळ मार्गावरही स्मूथ राइडसाठी प्लॅटिनाची ही नवी आवृत्ती बजाजने आणली आहे. कमी ऊर्जा घेऊनही चांगली इंधनक्षम असल्याचा बजाजचा दावा आहे. सस्पेंशन हे अधिक चांगले दिले असून या नव्या प्लॅटिनाचे हेच प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. १०० सीसी चे बजाज डीटीएसआय इंजिन असणारी प्लॅटिना धक्क्यांमधील २८ टक्के हादरे कमी करते असे सस्पेंशन असणारी आहे.

ठळक मुद्दे

सस्पेंशनमुळे सर्वसाधारण मोटारसायकलींच्या तुलनेत २८ टक्के कमी हादरा.

पुढईल सस्पेंशन कम्फर्टेक असून त्यामुळे चालवणाऱ्याला धक्क्यांचा त्रास कमी, त्यमुळे स्मूथ राइड.

मागील सस्पेंशनला लांब स्प्रिंग दुहेरी असून त्यामुळेही मागील सहप्रवाशाला आरामदायी वाटावे.

कम्फर्टेकची चाचणी ५५० शहरांमध्ये ४८०० लोकांद्वारे घेतली गेली आहे.

अधिक इंधनक्षमता

प्लॅटिनाची तांत्रिक वैशिष्ट्ये

इंजिन - सिंगल सिलिंडर, २ व्हॉल्व, डीटीएसआय ExhausTEC सह, १०२ सीसी

बोअर अॅण्ड स्ट्रोक - (मिमि) ४७ बाय ५८.८

कमाल ताकद - ७.९ पीएस @ ७५०० आरपीएम

कमाल टॉर्क - ८.३४ एनएम @ ५५०० आरपीएम

कमाल वेग - ९० किमी प्रति तास

गीअर - मॅन्युएल ४ - सर्व खाली टाकण्याचे

फ्रेम - ट्युब्यूलर सेमी डबल क्रॅडल

लांबी/ रुंदी/ उंची / व्हील बेस / ग्राऊंड क्लीअरन्स - २००३/७०४ /१०६९/ १२५५/ २०० (सर्व मिमि)

सस्पेंशन

फ्रंट - टेलिस्कोपिक फोर्क टाईप, १३५ मिमि ट्रॅव्हेल

रेअर - स्प्रिंग इन स्प्रिंग टाइप, ११० मिमि ट्रॅव्हेल

इंधन टाकी क्षमता ११.५ ली.

टायर - फ्रंट - २.७५- १७ आर , ४१ पी

रेअर - ३.००- १७ आर. - ५० पी

मूल्य - ४४ ६५६ रुपये ( एक्स-शोरूम दिल्ली)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.