नवी दिल्ली : Bajaj Auto ने त्यांची बहुप्रतिक्षित क्रुझर बाईक Avenger Street 160 चे ABS मॉडेल भारतात लाँच केले आहे. या बाईकची किंमत दिल्लीमध्ये एक्स शोरुम 82,253 असणार आहे. या बाईकद्वारे बजाजने अ‍ॅव्हेंजर 180 ला बदलले आहे. या बाईकची किंमत 6 हजार रुपये जास्त होती. 


नव्या सुरक्षा नियमावलीमध्ये दुचाकी, चारचाकींना एबीएस किंवा सीबीएस देणे बंधनकारक केले आहे. यामुळे भारतातील सर्वच बाईक यापुढे एबीएसमध्ये मिळणार आहेत. केवळ होंडाकडेच सीबीएस प्रणाली आहे. बजाज कंपनीने नव्या अ‍ॅव्हेंजर स्ट्रीटमध्ये सिंगल चॅनेल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) दिली आहे. 


नव्या अ‍ॅव्हेंजर स्ट्रीटमध्ये अन्य 150 आणि 180 सारखीच फिचर्स आहेत. यामध्ये एलईडी डे-टाईम रनिंग लाईट, रोडस्टर हेडलँप, ब्लॅक इंजिन देण्यात आले आहे. तसेच बाईकवर नवे ग्राफिक्स, ब्लॅक अलॉय व्हील्स आणि रबर फिनिश रिअर ग्रॅब रेल देण्यात आला आहे. 


अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 160 क्रूझर बाइकमध्ये 160.4 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14.7 बीएचपी ची ताकद आणि 13.5 एनएमचा टॉर्क प्रदान करते. ही ताकद अ‍ॅव्हेंजरच्या 180 शी मिळतीजुळती आहे. इंजिनला 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. ब्रेकसाठी पुढील बाजुला 220 mm सिंगल डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक आहेत. पुढच्या चाकाला एबीएस देण्यात आले आहे. 


बजाजची ही बाईक सुझुकीच्या इन्ट्रुडरला टक्कर देणार आहे. ही बाईक अ‍ॅव्हेंजर सिरिजमधील स्वस्त बाईक असल्याने हे शक्य आहे. इन्ट्रुडरची किंमत 1.01 लाखांपासून सुरु होते. 

English summary :
Bajaj Auto launched its much-awaited Cruiser Bike Avenger Street 160's ABS model in India. The price of this bike is going to be at 82,253 x showroom in Delhi. Avenger Street 160 Cruiser Bike is comes up with a 160.4 cc Single Cylinder engine.


Web Title: Bajaj launched cheapest avenger bike in India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.