Auto Expo 2018: New options for 'Greaves' three wheelers and small four-wheelers | Auto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय 
Auto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय 

मुंबई - घरपोच वाहतुकीची सेवा देणा-या वाहनचालकानूरुप अपेक्षित बदल करत यंदाच्या आॅटो एक्स्पो मध्ये तीनचाकी आणि छोट्या चार चाकी वाहनांसाठी नवीन वाहन प्रदर्शित करण्यात  आले आहे. घरपोच वाहतूक क्षेत्रातील ग्राहक आणि त्यांच्या गरजानुरुप कंपनीने उत्पादन श्रेणीत बदल केले आहे. यामुळे  उत्तम दर्जाची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सर्जनात कपात हे लक्ष्य साध्य होणार असून, सातत्याने वाढणार-या इंधन क्षेत्र आणि उदयोन्मुख इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र या दोन्हींमध्ये हे दर्जेदार वाहन ठरेल, असा विश्वास ग्रीव्ह्जतर्फे व्यक्त करण्यात आला. 

 तीनचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांच्या क्षेत्रातील तीसहून अधिक मूळ उपकरण उत्पादक अर्थात ओईएम्सना ग्रीव्ह्ज सध्या पुरवठा करत असलेल्या डिझेल व पेट्रोल पॉवरट्रेन्सचे (वाहनातील ऊर्जा निर्मिती करणारे भाग) बीएसव्हीआय प्रकार तयार असून तेही प्रदर्शनात दाखवले जात आहेत. त्याचप्रमाणे बीएसव्हीआय तंत्रज्ञानाला अनुकूल असलेले मल्टि-सिलिंडर टर्बो चार्ज्ड इंटरकुल्ड इंजिनही प्रदर्शनासाठी मांडण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण इंजिन आणि दुय्यम बाजारपेठेसाठीची सोल्युशन्स बाजारात आणून घरपोच वाहतूक सुविधा व सेवांची रचना नव्याने करण्याचे लक्ष्य ग्रीव्ह्ज कॉटनने ठेवले आहे. 

या बाबत ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश बसवनहळ्ळी म्हणाले, भविष्यकाळातील आव्हानांसाठी सज्ज अशा उपायांसह तसेच ग्राहकांना कार्यक्षम व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने श्रेष्ठ उत्पादने व सेवा देऊन घरपोच वाहतूक क्षेत्राची पुनर्रचना करण्याचे आमचे लक्ष्य आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन पॉवरट्रेन सोल्युशन प्रदर्शित करण्यासाठी आम्ही पिनॅकल इंजिनीअरिंग आणि अल्टीग्रीन सोल्युशन्स या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले ग्रीव्ह्ज आॅटोकेअर तीनचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत असून आमची नव्याने तयार केलेली डिझेल आणि सीएनजी इंजिन्स बीएसव्हीआय नियमांना अनुकूल आहेत. या उपक्रमांमुळे आम्ही आमच्या ध्येयाच्या आणखी जवळ गेलो आहोत. 

या एक्स्पोमध्ये भविष्यकाळाची गरज पूर्ण करणारी तीनचाकी ईव्ही (3ह एश्) संकल्पनाही प्रदर्शित केली जात आहे. यामध्ये शैलीदार, हलक्या वजनाच्या बॉडीमध्ये ग्रीव्ह्ज अल्टीग्रीन ड्राइव्ह ट्रेन तंत्रज्ञानाचे सर्व लाभ सामावलेले आहेत. ग्रीव्ह्जने आॅटो एक्स्पो २०१८ साठी आपल्या पॉवरट्रेन सोल्युशनवर आधारित तीनचाकी ई-थ्रीची संकल्पना सादर केली. या नवीन वाहनाची हलक्या वजनाची बॉडी एमजी समूहाच्या सहयोगाने तयार करण्यात आली आहे. ग्रीव्ह्ज कॉटनच्या हलक्या बॅटरीपासून तयार झालेल्या आणि अचल भाग कमी असलेल्या अनोख्या ईव्ही पॉवरट्रेनला ती पूरक आहे.


Web Title: Auto Expo 2018: New options for 'Greaves' three wheelers and small four-wheelers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.