Auto Expo 2018: Hyundai Elite i20; Price lower than Maruti Balano | Auto Expo 2018: ह्युंडाईने आणली ELITE i20; किंमत मारुती बलेनोपेक्षा कमी
Auto Expo 2018: ह्युंडाईने आणली ELITE i20; किंमत मारुती बलेनोपेक्षा कमी

नवी दिल्लीः जगभरातील कार कंपन्यांचा 'कुंभमेळा', अर्थात दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीने आपल्या झळाळत्या 'फ्युचर एस कॉन्सेप्ट'चं दर्शन घडवल्यानंतर ह्युंडाईने i20 फेसलिफ्ट आणि IQNIQ या दोन चकाचक आणि टकाटक गाड्यांची झलक दाखवली. 

ह्युंडाईच्या भारतीय बाजारातील प्रवेशाला यंदा दोन दशकं पूर्ण होत आहेत. या २० वर्षांचं सेलिब्रेशन झोकात करण्याच्या हेतूनेच कंपनी कारप्रेमींसाठी दोन अद्ययावत कारची भेट घेऊन येतेय. ELITE i20 याच वर्षी बाजारात दाखल होतेय. ही कार म्हणजे i20 या त्यांच्या लोकप्रिय कारचं पुढचं व्हर्जन आहे. कारचं डिझाइन, आतील रचना बदलण्यात आली असून इतरही नवी फीचर्स या कारमध्ये आहेत. 

ह्युंडाई ELITE i20 च्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 5.34 लाख ते 7.9 लाख रुपयांच्या घरात असेल, तर डिझेल कार 6.73 लाख ते 9.15 लाखांत ग्राहकांना मिळेल. 

IQNIQ ही लक्झरी कारही याच वर्षाअखेरीस लाँच केली जाणार आहे. त्याची किंमत 20 लाखाच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. 2020 पर्यंत नऊ नव्या कार बाजारात आणण्याचा ह्युंडाईचा मानस आहे. 

'द मोटर शो 2018' च्या 14 व्या मोसमाची सुरुवात आज सकाळी झाली.  आशियातील हा सर्वात मोठा ऑटो एक्स्पो आहे. ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्टमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत हा ऑटो एक्सपो चालणार आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या गाडया पाहण्याची संधी मिळणार असल्याने सर्वसामान्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्स्पोला भेट देतील, असा अंदाज आहे. आजचा आणि उद्याचा दिवस प्रसारमाध्यमांसाठी राखीव ठेवण्यात आला असून 9 ते 14 जानेवारी दरम्यान कारप्रेमी या 'कुंभा'त सहभागी होऊ शकतील. या शोमध्ये 36 पेक्षा जास्त कंपन्यांनी आपल्या गाड्या, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडल्यात. इलेक्ट्रिक कार हे या ऑटो एक्स्पोचे खास वैशिष्ट्य आहे.

English summary :
Auto Expo 2018: Hyundai Elite i20 Facelift Launched in India for Rs 5.34 Lakh at Auto Expo in Delhi. New 2018 Hyundai Elite i20 gets a new 7-inch touchscreen infotainment system that supports Apple CarPlay and Android Auto.


Web Title: Auto Expo 2018: Hyundai Elite i20; Price lower than Maruti Balano
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.