ठळक मुद्देगाडी आतून बाहेरून पूर्णपणे धुवून घ्याअंतर्गत भागात कुठे दमटपणामुळे कुबट वास असू शकतोकारच्या तळाकडील बाजूला स्वच्छ करून घ्या

पावसाळा संपला की पावसाळ्यामध्ये अनेकदा काही समस्या निर्माण झाली असेल तर ती दूर करण्यासाठी कार लगेच सर्व्हिसिंग करून घेणे अतिशय गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये कार चालवताना अनेकदा नकळत काही समस्या कारला त्रासदायक ठरत असतात. प्रत्यक्षात त्या कार चालवताना जाणवतही नाहीत किंवा तसेच रेटून कार चालवण्याचा प्रकार काही लोक करतात.

पावसामध्ये कार चालवताना पावसाच्या पाण्याचा विशेष करून साचलेल्या पाण्यातून तर कधी जास्त पाण्यातून कार चालवली जाते. त्यावेळी कुठे ना कुठे काही तळातील बाजून आपटू शकते, कधी दगड असतो, कधी लोखंजी वस्तू आपटलेली असते. सीएनजी कारना पावसामध्ये अनेकदा बंद पडण्याचीही वेळ आलेली असते. या सार्यांबरोबरच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चिखलामुळे कार तुमही तळातील बाजूने अनेकदा माखलेली असते. लांबच्या प्रवासामध्ये गेला असाल तर विशेष करून कारच्या अंतर्गत भागातही पाण्यामुळे काही ना काही खराब झालेले असते.

सर्वच काही रबरी मॅटवर नसते. आतील बाजूलाही चिखल, पाणी यामुळे घाण लागू शकते. यामुळेच पावसामध्ये अनेकदा कारकडे जर दुर्लक्ष झालेले असेल तर त्याकडे पावसाळा झाला की लगोलग लक्ष द्यावे. पावसाळ्यापूर्वी जशी कार गॅरेजला नेऊन तिचे सर्व्हिसिंग करतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यानंतरही तिचे सर्व्हिसिंग करून घेणे उत्तम.पावसानंतर केवळ सर्व्हिंसिंग नव्हे तर तपासणीही पूर्णपणे होणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे तुम्हाला हिवाळा व उन्हाळ्यापर्यंतचे काही महिने म्हणजे सुमारे सात महिने कार पावसातील दुष्परिणामांपासून दूर ठेवता येईल.

काय पाहाल सर्व्हिंसिंमध्ये?

गाडी आतून बाहेरून पूर्णपणे धुवून घ्या

अंतर्गत भागात स्वच्छता ठेवा

अंतर्गत भागात कुठे दमटपणामुळे कुबट वास असू शकतो.

कुबट वास जास्त येत असेल तर ती अधिक चांगली स्वच्छ करून घ्या

कारच्या तळाकडील बाजूला स्वच्छ करून घ्या

गंज चढत असेल तर तपासून पाहा

स्टील रीमही तपासून घ्या.

वायरींग खराब झाले नाही ना ते पाहा.

वातानुकूलीत यंत्रणा तपासून घ्या

डिक्कीही स्वच्छ करा

मडगार्ड, त्यामागील भाग, स्वच्छ करून घ्या.

तळातील भागात कुठे नुकसान झालेले नाही ते पाहा.

कूलन्ट, सर्व तेलाच्या पातळ्या तपासा

बॉनेट उघडूनही त्यात चिखल व अन्य काही त्रासदायक असेल तर तपासा

पाण्याची गळती झालेला टप, काचेच्या कडा, अन्य संलग्न भाग तपासा

इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, सेन्सर्स तपासून घ्या.