New Mercedes Benz: मर्सिडीज बेन्जची आलिशान सी-क्लास कार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:32 PM2018-09-20T15:32:23+5:302018-09-20T15:36:17+5:30

जर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेन्जने भारतात आपलं सी-क्लासचं नवीन फेसलिफ्ट मॉडल लॉन्च केलं आहे. सी-क्लास कंपनीची जगभरातील बेस्ट सेलिंग टॉप कारपैकी एक आहे.

2018 Mercedes Benz C-class facelift launched in India, Here are the price and details | New Mercedes Benz: मर्सिडीज बेन्जची आलिशान सी-क्लास कार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत!

New Mercedes Benz: मर्सिडीज बेन्जची आलिशान सी-क्लास कार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत!

googlenewsNext

(Image Credit : www.financialexpress.com)

नवी दिल्ली : जर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेन्जने भारतात आपलं सी-क्लासचं नवीन फेसलिफ्ट मॉडल लॉन्च केलं आहे. सी-क्लास कंपनीची जगभरातील बेस्ट सेलिंग टॉप कारपैकी एक आहे. नव्या मॉडेलमध्ये डिझाइनला रिफ्रेश्ड लूक, नवीन फीचर्स आणि BS-VI इंजिन देण्यात आलं आहे. या कारची किंमत ४० लाख रुपयांपासून सुरु होते आणि इंजिन व व्हेरिएंटनुसार, किंमत वेगळी असेल. 

C 220d Prime मॉडेलची किंमत ४० लाख रुपये, C 220d प्रोग्रेसिव्हची किंमत ४४.२५ लाख रुपये आणि C 300d या टॉप AMG ट्रिमची किंमत ४८.५० लाख रुपये आहे.  

2018 Mercedes-Benz C-Class सिडेनमध्ये एक मोठा बदल बघायला मिळणार आहे आणि तो बदल म्हणजे याचं री-डिझाइन्ड बंपर आणि मोठं फ्रन्ट ग्रील. या कार्समध्ये A-Class रेंजच्या कारमधील सिग्नेचर डायमंड पॅटर्न असलेलं ग्रिल डिझाइन देण्यात आलं आहे. हेच डिझाइन C300d AMG लाइन वर्जन मध्येही देण्यात आलं आहे. यात टेल लॅम्पचा शेप आधीसारखाच ठेवण्यात आला आहे. पण आता यात नवीन एलईडी सिग्नेचर लाइट्स असतील. 



 

नवीन मर्सिडीज C-Class फेसलिफ्ट इंटेरिअर सुद्धा अपडेट करण्यात आलं आहे. आता यात नवीन १०.२५ इंचाची मीडिया डिस्प्ले स्क्रीन आणि न्यू जनरेशन असलेला टेलिमेटिक्स दिसेल. तर डॅसबोर्ड ले-आऊटमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाहीये. 

C-Class केवळ डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असेल. नवीन C-Class मर्सिडीजची स्पर्धा भारतात BMW 3 Series, Audi A4, Volvo S60 आणि Jaguar XE या कार्ससोबत असणार आहे. 

Web Title: 2018 Mercedes Benz C-class facelift launched in India, Here are the price and details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.