हागणदारीमुक्तीचा फटका जि.प.शाळेला

By Admin | Published: July 17, 2017 11:28 PM2017-07-17T23:28:54+5:302017-07-17T23:31:01+5:30

हिंगोली : शहरातील मंगळवारा जि.प. प्राथमिक शाळा शाखा क्र.१ व २ हागणदारीमुक्तीसाठी बांधलेल्या शौचालयाच्या ड्रेनेजचे पाणी येत असल्याने जवळपास ३00 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ZP Shale was hit by a hammer | हागणदारीमुक्तीचा फटका जि.प.शाळेला

हागणदारीमुक्तीचा फटका जि.प.शाळेला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील मंगळवारा जि.प. प्राथमिक शाळा शाखा क्र.१ व २ हागणदारीमुक्तीसाठी बांधलेल्या शौचालयाच्या ड्रेनेजचे पाणी येत असल्याने जवळपास ३00 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेला वारंवार कळवूनही याची दखल घेतली जात नसल्याने शाळा प्रशासनही हैराण आहे. आज मुले नगरसेवकाच्या घरावर धडकले अन् लगेच कामाला प्रारंभ झाला.
हिंगोली शहरातील मंगळवारा भागात जि.प. कन्या व मुलांची शाळा आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत या शाळा भरतात. एका सत्रात १६५ तर उर्वरित दुसऱ्या सत्रात आहेत. या शाळेला लागूनच हिंगोली नगरपालिकेने स्वच्छतागृह उभारले आहे. हागणदारीमुक्तीसाठी झटपट काम आटोपण्याच्या नादात या स्वच्छतागृहाचे आऊटलेटच योग्य स्थितीत काढण्यात आले नाही. शाळेच्या मागच्या बाजूला कीचन शेडनजीकच ड्रेनेज फुटले आहे. त्याचे पाणी शाळेच्या आवारापर्यंत येत आहे. त्यामुळे मुलांचे खेळण्याचे मैदान ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याने व्यापले आहे. एवढेच नव्हे, तर या मुलांना खिचडी व दुपारचे जेवण याच ठिकाणी करावे लागते. त्यामुळे काही मुलांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. आज काही मुली या भागाच्या नगरसेविका ज्योती बंडू कुटे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी ही बाब पालिकेला कळवून मुलांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली.
याबाबत विचारले असता शाळेतील शिक्षक रामदास कावरखे म्हणाले, आम्ही याबाबत नगरपालिकेला पत्र दिलेले आहे. त्यांच्याकडून हे काम लवकरच केले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजून दुरुस्ती झाली नाही. पालक त्यामुळे आम्हाला दोषी धरू लागले आहेत.

Web Title: ZP Shale was hit by a hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.