यंग इलेव्हन, लकी स्टार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:01 AM2018-03-20T01:01:58+5:302018-03-20T11:05:38+5:30

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन स्टार, लकी सी. सी. आणि देवळाई संघांनी विजय मिळवला. राजेश कीर्तिकर, इम्रान पटेल, हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

Young XI, Lucky Star wins | यंग इलेव्हन, लकी स्टार विजयी

यंग इलेव्हन, लकी स्टार विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन स्टार, लकी सी. सी. आणि देवळाई संघांनी विजय मिळवला. राजेश कीर्तिकर, इम्रान पटेल, हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
सकाळच्या सत्रात देवळाई संघाने एआरसीसीविरुद्ध ९ बाद १९८ धावा केल्या. त्यांच्याकडून राजेश कीर्तिकरने २५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. नुरुल सय्यदने ३७, नीलेश राठोडने २७ व अबुबकर पटेलने २३ धावा केल्या. मयंक विजयवर्गीय व रोहन शाह यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एआरसीसी संघ ४ बाद १५९ धावा करू शकला. त्यांच्याकडून रोहन शाहने ४५ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ६५, दशवीरसिंगने ३७ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात पटेल इलेव्हनने ७ बाद १२६ धावा केल्या. त्यांच्याकडून विद्येश निंभोरकरने ४४ धावा केल्या. लकी सी. सी.कडून मोहमद वसीमने २४ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात लकी सी.सी.ने १५.१ षटकांत ४ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २३ चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांसह ४९ व मुसा सोहेलने २३ धावा केल्या.
तिसºया सामन्यात यंग इलेव्हन स्टार संघाने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या. त्यांच्याकडून नौशाद हाशमीने ३१ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह ४६, संजन भारतने २१ चेंडूंत ९ चौकारांसह ४२ व हुसेन अमोदीने १४ चेंडूंत ५ चौकारांसह २७ व ए. सीमेने १० चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ धावा केल्या. प्रत्युत्तरात साई सी. सी. ६ बाद १३२ धावा करू शकला. त्यांच्याकडून कुणाल पाराशरने ४५, आकाश बोराडेने २१ व ओमकारने २८ धावा केल्या. यंग इलेव्हन स्टारकडून हुसेन अमोदी, मुनीर गाझी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

Web Title: Young XI, Lucky Star wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.