यंग इलेव्हन, काणे अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:56 AM2018-03-22T00:56:33+5:302018-03-22T00:57:39+5:30

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत काणे अकॅडमी, एमजीएम आणि अलॉफ्ट सी.सी. संघांनी विजय मिळवले. ए.आर.सी.सी. संघाविरुद्ध काणे अकॅडमीने २0 षटकांत ५ बाद १६८ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश काळेने ३२ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ५५, आशिष देशमुखने ३३ धावा केल्या. ए.आर.सी.सी.कडून प्रशांत नायरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए.आर.सी.सी. संघ ६ बाद १0३ पर्यंत मजल मारू शकला.

 Young XI, Kane Academy won | यंग इलेव्हन, काणे अकॅडमी विजयी

यंग इलेव्हन, काणे अकॅडमी विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत काणे अकॅडमी, एमजीएम आणि अलॉफ्ट सी.सी. संघांनी विजय मिळवले.
ए.आर.सी.सी. संघाविरुद्ध काणे अकॅडमीने २0 षटकांत ५ बाद १६८ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश काळेने ३२ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ५५, आशिष देशमुखने ३३ धावा केल्या. ए.आर.सी.सी.कडून प्रशांत नायरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए.आर.सी.सी. संघ ६ बाद १0३ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून रोहन शाहने ३६ व दशवीरसिंगने ३0 धावा केल्या. काणे अकॅडमीकडून रामेश्वर दौड, ऋषिकेश काळे, आशिष देशमुख, व्यंकटेश काणे व सिद्धेश पेरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसऱ्या लढतीत यंग इलेव्हनने २0 षटकांत ७ बाद १६२ धावा केल्या. त्यंच्याकडून प्रदीप जगदाळेने ३५ चेंडूंत एक षटकार व ५ चौकारांसह ४९, अजय काळेने ३३ व संदीप नागरेने २२ धावा केल्या. यंग इलेव्हन स्टारकडून जावेद अकीब व सय्यद आरेफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन स्टार संघ ९ बाद १0६ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून सय्यद आरेफने नाबाद ३९९ धावा केल्या. यंग इलेव्हनकडून संदीप नागरेने २३ धावांत ३ गडी बाद केले. प्रवीण क्षीरसागर व उदय पांडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तिसºया सामन्यात अलॉफ्ट सी.सी. संघाने जेएमसीसीविरुद्ध ११४ धाव केल्या. त्यांच्याकडून शेख मुकीमने २८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३४ धावा केल्या. जेएमसीसीकडून जितू गंगवाल याने २६ धावांत ४ गडी बाद केले. सूरज सुलाने व रोहन राठोड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जेएमसीसी संघ १0२ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून रोहन राठोडने सर्वाधिक ३१ धावा केल्या. अलॉफ्ट सी.सी.कडून मोहंमद आमेरने १३ धावांत ४ गडी बाद केले. अनिकेत काळेने १४ धावांत ३ बळी घेतले.

Web Title:  Young XI, Kane Academy won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :