जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी शिवाजी पुतळा परिसरात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला होता.
माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महिला काँग्रेसने थाळीनाद आंदोलन करून निषेध नोंदविला. तत्पूर्वी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, महिला जिल्हाध्यक्षा शीतल तनपुरे, शहराध्यक्ष अब्दुल हफिज, प्रदेश सचिव विजय कामड, शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, विजय चौधरी, राम सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शीतल तनपुरे यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयामुळे सामान्य जनतेला दैनंदिन व्यवहार करताना कशी अडचण येत आहे, त्याचबरोबर जनता कशी कंटाळली आहे बाबत सविस्तर माहिती दिली. माजी आ. कैलास गोरंट्याल, प्रदेश सचिव विजय कामड, शहराध्यख अब्दुल हफिज, माजी शहराध्यक्ष शेख महेमूद, सुषमा पायगव्हाणे, चंदाताई भांगडिया यांनी भाषणातून मोदी सरकारचा निषेध केला. याप्रसंगी इतर पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली.
याप्रसंगी नगरसेविका संगीता पाजगे, छाया वाघमारे, प्रीती कोताकोंडा, मीनाक्षी खरात, पुनम भगत, सुमन हिवराळे, संध्या देठे, लक्ष्मीबाई जगदाळे, मथुराबाई सोळुंके, शकीलाखान, बिलकीस बेगम, मंगल खांडेभराड, निमाबाई सले, बदर चाऊस, अंकुश राऊत, महावीर ढक्का, शेख नजीब अहमद, रमेश गौरक्षक, राजेंद्र वाघमारे, जावेद अली, गणेश शेलार, मोहन इंगळे, शेख जावेद, ज्ञानेश्वर उगले, वाजेद खान, जगदीश भरतिया, विनोद रत्नपारखे, अरूण सरदार, शेख इरशाद, संजय भगत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.