१८ ग्रामपंचायतींचा कारभार हाकणार महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:35 AM2017-10-10T00:35:05+5:302017-10-10T00:35:05+5:30

तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची निवड झाली आहे. विजयी झालेल्या बहुतांश उमेदवार आपल्या पक्षाचा असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

 Women will take charge of 18 Gram Panchayats | १८ ग्रामपंचायतींचा कारभार हाकणार महिला

१८ ग्रामपंचायतींचा कारभार हाकणार महिला

googlenewsNext

जालना : २७ पैकी सर्वाधिक जागांवर सेनेचा दावा
बाबासाहेब म्हस्के
जालना : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची निवड झाली आहे. विजयी झालेल्या बहुतांश उमेदवार आपल्या पक्षाचा असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दुस-या टप्प्यातील २७ ग्रापंचायतींसाठी सोमवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये मतमोजणी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले.
२९ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २७ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सोमवारी तहसीलदार विपिन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली.
मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार, सदस्य व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या फेरीत राममूर्ती, ढगी, पानशेंद्रा, साळेगाव नेर, पीरपिंपळगाव या गावांची मतमोजणी झाली. त्यानंतर दुस-या, तिस-या, चौथ्या आणि पाचव्या फेरीमधील गावांचे निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार बाहेर उभ्या असलेल्या समर्थकांना हात उंचावून विजयी झाल्याचे सांगत होते. विजयी उमेदवार बाहेर येताच त्यांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करताना दिसून आले. मतमोजणी स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
----------
जालना तालुक्यातील सरपंचपदाचे उमेदवार
राममूर्ती - सुमन मगर
अहंकार देऊळगाव - मंगल सोमधाने
साळेगाव (हडप) - विनायक गुळमकर
मोतीगव्हाण - सुरेखा मोहिते
मोहाडी - लक्ष्मण पवार
ढगी - मारोती केंद्रे,
धावेडी-थार - प्रभाकर ईटकर
वरखेडा (सिंदखेड) - वर्षा खरात,
पाष्टा - प्रकाश इलग
माळी पिंपळगाव- रामकला पितळे
पानशेंद्रा - रेणुका पाचरणे
गवळी पोखरी - आश्विनी वाघमार
सावरगाव हडप - शकुंतला आढाव
मानेगाव (खा) - पदमाकर हांडे
खांबेवाडी-नागापूर - द्वारकाबाई खरात
साळेगाव (नेर) - गौरखनाथ पाडमुख
टाकरवन - मंगलबाई खडेकर
एरंड वडगाव - ऊषा नरवडे
सोलगव्हाण-कवठा - उमाजी तेलंग
पाहेगाव - लहू चव्हाण
नंदापूर - दत्तात्रय चव्हाण
पोखरी (सिंदखेड) - लताबाई घडलिंग
रामनगर - स्वाती शेजूळ
सावरगाव भागडे - शांताबाई अंभोरे
पीर पिंपळगाव - मनिषा कोरडे
नेर - खान बबीबाई दाऊद खान,
शेवगा-सारवाडी
शेवगा/सारवाडी-नेर - जयश्री कुपटकर (बिनविरोध),
मजरेवाडी - परसुवाले मोहम्मद प्यारू (बिनविरोध)

Web Title:  Women will take charge of 18 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.