महोत्सव जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:02 AM2018-01-19T00:02:56+5:302018-01-19T00:03:01+5:30

चित्रपट पाहिल्याने सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होते. सिनेमासारखे सर्वांत सुंदर काही नाही. त्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’ आहे. सिनेमा कसा पाहावा याची नवदृष्टी या महोत्सवातून मिळते, अशा शब्दात चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक व महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी चित्रपट महोत्सवाचे वर्णन केले. पुढील वर्षी महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल, अशी त्यांनी घोषणा करताच उपस्थित सर्व सिनेरसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना तेवढाच जोरदार पाठिंबा दिला.

The 'window' of the festival to see the world | महोत्सव जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’

महोत्सव जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’

googlenewsNext
ठळक मुद्देपर्वणी : औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चित्रपट पाहिल्याने सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होते. सिनेमासारखे सर्वांत सुंदर काही नाही. त्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’ आहे. सिनेमा कसा पाहावा याची नवदृष्टी या महोत्सवातून मिळते, अशा शब्दात चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक व महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी चित्रपट महोत्सवाचे वर्णन केले. पुढील वर्षी महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल, अशी त्यांनी घोषणा करताच उपस्थित सर्व सिनेरसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना तेवढाच जोरदार पाठिंबा दिला.
प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स थिएटर येथे गुरुवारी सायंकाळी अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, स्मिता तांबे, अभिनेते उपेंद्र लिमये, महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबादवर मी खूप प्रेम करतो असे म्हणत महेश मांजरेकर यांनी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. औरंगाबादमुळे मी घडलो, असे सांगताना त्यांनी लेखक अजित दळवी व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा उल्लेख केला. तीन दिवस देशी व विदेशी भाषांतील विविध चित्रपटांचा आनंद लुटा असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. चित्रपट महोत्सवासाठी यंदा औरंगाबादकरांनी पुढाकार घेतला याचे कौतुक मृणाल कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी, प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी केले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, ज्युरी समितीचे अध्यक्ष विकास देसाई, प्रा. एमी कॅटलीन, समीक्षक सैबल चॅटर्जी, प्रा. अजित दळवी, सुजाता कांगो आदींची उपस्थिती होती. महोत्सव यशस्वितेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नीलेश राऊत व सहकारी परिश्रम घेत आहेत.
२८ चित्रपटांची मेजवानी
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशी-विदेशी भाषांतील २८ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यात ३ मराठी भाषेतील असून अन्य ६ विविध भाषांतील चित्रपट असणार आहेत. उद्घाटनानंतर मनोज वाजपेयी अभिनित व अतुन मुखर्जी दिग्दर्शित ‘रुख’ चित्रपट दाखविण्यात आला.

Web Title: The 'window' of the festival to see the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.