चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:55 PM2018-06-06T23:55:51+5:302018-06-06T23:56:40+5:30

तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.

Wear four times a year to get water! | चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

googlenewsNext
ठळक मुद्देजायकवाडी : उन्हाळ्यातील तीन महिन्यांत १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ

संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना यासह विविध प्रादेशिक पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी देण्यात येते. याच पाण्यातून नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या भागांतील शेती सिंचनाखाली येते. उन्हाळा सोडला, तर इतर कालावधीत दररोज ०.४०० ते ०.६०० दशलक्ष घनमीटर एवढे पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाते; परंतु उन्हाळ्याला सुरुवात होताच यामध्ये दुपटीने वाढ होते. यंदा मार्चमध्ये तापमानाचा पारा ३८.३ अंशांवर पोहोचला. त्यानंतर एप्रिलमध्ये ४१ आणि मे महिन्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत ताममान गेले. तापमान जसजसे वाढत गेले तसे जायकवाडीतील बाष्पीभवनही वाढत गेले. मार्च महिन्यात ४०.३७८, तर एप्रिलमध्ये ५०.००७ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. मे महिन्यात ४९.९०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जायकवाडी येथे बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आलेले आहे. यातून जलाशयात होणाऱ्या बाष्पीभवनाची नोंद होते.
औरंगाबादला महिन्याकाठी जवळपास ९ दशलक्ष घनमीटर याप्रमाणे तीन महिन्यांसाठी सुमारे २७ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. तीन महिन्यांत बाष्पीभवन झालेल्या पाण्यातून किमान चार महिने जायकवाडीतून पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देता आले असते. पाण्याचे बाप्षीभवन थांबविण्यासाठी थर्माकोल, सोलार पॅनल इतर पर्यायांचा वापर केला जातो; परंतु जायकवाडीच्या पाण्याचे क्षेत्र पाहता हे अशक्य आहे. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. बाष्पीभवन हे नैसर्गिक चक्र असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनातून पाणी आटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे.
काही प्रमाणात का होईना उन्हाळ्यात जायकवाडीतील पाणी छोट्या प्रकल्पात साठविण्याचा उपाय महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जायकवाडीमध्ये १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची फार अडचण नाही. पाणीवापराच्या नियोजनानुसार पाणीसाठा योग्य पद्धतीने पुरवला जात असल्याचे अधिकारी सांगतात.
सेकंडरी स्टोअरची कल्पना
४पाणी वाचविण्यासाठी उन्हाळ्यात सेकंडरी स्टोअर कल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकते. औरंगाबाद शहर परिसराला लागणारे पाणी १ मार्चनंतर जलवाहिनीद्वारे शहराजवळ छोट्या प्रकल्पात साठवायचे. प्रकल्प लहान असल्याने त्यातून कमी प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी वाचविणे शक्य आहे. अनेक देशांत ही कल्पना प्रत्यक्षात राबविली गेली आहे.
-प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

Web Title: Wear four times a year to get water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.