पाणीपुरवठ्याचे शटडाऊन १२ नव्हे, ८ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:07 AM2019-06-20T00:07:30+5:302019-06-20T00:08:52+5:30

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २४ तास सुरळीत राहावा या उदात्त हेतूने जायकवाडीत २८ जून रोजी देखभाल दुरुस्तीसह ‘रिंग मेन ...

Water supply shutdown is not 12, 8 hours | पाणीपुरवठ्याचे शटडाऊन १२ नव्हे, ८ तास

पाणीपुरवठ्याचे शटडाऊन १२ नव्हे, ८ तास

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरण : २८ जून रोजी दिवसभर दुरुस्तीची कामे


औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २४ तास सुरळीत राहावा या उदात्त हेतूने जायकवाडीत २८ जून रोजी देखभाल दुरुस्तीसह ‘रिंग मेन युनिट’ बसविण्यात येणार आहे. या कामासाठी वीज कंपनीने महापालिकेला शटडाऊन मागितले होते. अवघ्या ८ तासांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. महापालिकेने १२ तास शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. महावितरणबरोबरच महानगरपालिकाही या काळात आपली दुरुस्तीची कामे करणार आहे.
महापालिकेच्या जायकवाडी व फारोळा येथील पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणने गेल्या सहा महिन्यांपासून शटडाऊन घेतलेले नाही. या काळात विद्युत वाहिन्यांच्या लगत असणाºया झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. त्या तोडण्याचे काम शटडाऊनदरम्यान करण्यात येणार आहे, तसेच विद्युत वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीची इतर कामेही शुक्रवार, दि.२८ जून रोजी करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महावितरणच्या वतीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यासाठी आरएमयू (रिंग मेन युनिट) बसविण्यात येणार आहे. महावितरणला १२ तासांचे शटडाऊन घेण्याची मुदत दिल्याचे महानगरपालिकेने जाहीर केले असले तरी २८ जूनला प्रत्यक्षात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीसह आरएमयूचे काम करण्यात येणार आहे. शटडाऊनच्या काळात स्वत:चीही दुरुस्तीची कामे करणार असल्याचे महानगरपालिकेने महावितरणला कळवले आहे.
नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे
शुक्रवार, दि.२८ जून रोजी जायकवाडी, फारोळा येथील पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १२ तास बंद राहणार आहे. शुक्रवारी शहरात कुठेच पाणीपुरवठा होणार नाही. मध्यरात्री जायकवाडीहून पाणी आल्यास शनिवारी काही वसाहतींना पाणी देण्यात येईल. मनपाने यापूर्वी शहराचा पाणीपुरवठा २९ जून रोजी एक दिवसासाठी पुढे ढकलला नाही. शटडाऊनमुळे शहराला किमान दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागेल. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
फ्लोटिंग पंपात गवत, शेवाळ
जायकवाडी धरणातून शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही दिवसांपासून आपत्कालीन फ्लोटिंग पंपातही गवत आणि शेवाळ अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वारंवार हे शेवाळ व गवत काढण्यासाठी कर्मचाºयांना रात्रभर सतर्क राहावे लागत आहे. दुसरीकडे उपसा घटत असल्याने सिडको-हडकोतील जलकुंभ पूर्णपणे भरत नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.

Web Title: Water supply shutdown is not 12, 8 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.