रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:58 PM2019-06-25T22:58:39+5:302019-06-25T22:58:51+5:30

रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

Water supply in Ranjangaon is not possible | रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

googlenewsNext

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.


गावातील मातोश्रीनगर, पवननगर या भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नळाला विद्युत पंप लावून पाणी भरले जात असल्यामुळे अनेक वसाहतींतील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने जवळपास दीड हजार मोटारी जप्त केल्या होत्या. दरम्यान, मोटारी जप्त होऊनही गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पदरमोड करून जार अथवा टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज मंगळवारी मातोश्रीनगर-पवननगर या भागातील संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकले. पाणीपट्टी भरूनही नियमितपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोप करीत महिला व नागरिकांनी सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजूळ, ग्रामविकास अधिकारी एस.एन. रोहकले यांना धारेवर धरले होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याचे आंदोलनकर्त्या नागरिकांना सांगितले. सर्व वसाहतींत टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. या आंदोलनात मिलिंद सिरसाठ, अली सय्यद, सुशीला जाधव, आरती जाधव, उज्ज्वला जाधव, वंदना गोरे, स्वाती जाधव आदींनी सहभाग नोंदविला होता. 

Web Title: Water supply in Ranjangaon is not possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज