लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी लघुपाटबंधारे उपविभाग औंढा या कार्यालयाची १ जानेवारी २०१७ रोजी सुरूवात झाली. येथे ५ अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती असून कार्यालयाचा वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५.४५ आहे. मात्र येथे कधीही अधिकारी हजर नसतात.
सदर प्रतिनिधीने या विभागाला सोमवारी भेट देऊन पाहणी केली असता कनिष्ठ लिपिक एस.ए.शेवाळे उपस्थित होते. त्यांना अधिकाºयांबाबत विचारले असता उपविभागीय अभियंता एस.आर. पाटील हे असून त्यांच्याकडे सध्या प्रभारी पदभार आहे. ते कधीमधी कार्यालयात येतात. तर कनिष्ठ अभियंता एस.एस.राठोड, वरिष्ठ लिपीक पी.एस. सरकलवार, एन.एच. पवार हे गैरहजर होते. एकूणच हे कार्यालय केवळ नावालाच औंढा येथे उभारले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून कोणतीही कामे होत नाहीत. तर अधिकारी कधी कार्यालयात येत नाही. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ म्हणण्याची वेळ औंढावासियांवर आली आहे. शासनाची कामेच नसल्याने अधिकाºयांना कार्यालयात येण्यात कोणताच रस नसल्याचे सांगितले जात आहे.