टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:44 PM2019-03-18T23:44:39+5:302019-03-18T23:45:22+5:30

जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.

Water cutback crisis due to tanker industry | टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा प्रशासन घेणार निर्णय : औद्योगिक वसाहतीतील जलकुंभावर टँकरची गर्दी

औरंगाबाद : जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याबाबत काहीही निर्णय अजून तरी झालेला नाही. अनियोजित पाणी कपातीबाबत सोमवारी एमआयडीसीअधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द झाली, आता मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे याप्रकरणी बैठक होणार आहे.
एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून समजलेली माहिती अशी, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर टँकरचालक पाण्याची लेव्हल येऊ देत नाहीत. शेंद्रा येथील जलकुंभावर सरपंचांपासून सगळ्यांचीच गर्दी असते. जिल्हा प्रशासन एमआयडीसीवर सर्व जबाबदारी टाकून मोकळे झाले आहे. शेंद्रा येथील पाणीपुरवठा क्षमता कमी आहे. याची जाणीव जिल्हा प्रशासनाला करून दिलेली आहे. एमआयडीसीवरील भार कमी केला नाही तर उद्योगांना पाणी असताना त्रास सहन करावा लागेल. टँकरचालक जलकुंभाचा ताबा घेऊन एमआयडीसीच्या २ कर्मचाºयांवर दादागिरी करतात. ११४ टँकरचालक आणि क्लीनरची गर्दी रोजची आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत उद्योगांना त्रास
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका योग्य आहे; परंतु त्यासाठी उद्योगांच्या पाण्याचे काय करायचे, याबाबत प्रशासन काहीही सांगत नाही. टँकरभरणा केंद्र वाढवून कसे जमेल. ३.८३ एमएलडी पाणी टँकरसाठी जात आहे. ११४ टँकरच्या २२८ फेºया होतात. २४ हजार लिटरचे १६० टँकर आहेत. शेंद्रा येथे ५ ते ७ एमएलडी पाण्याची क्षमता आहे. अर्धे पाणी टँकरला दिल्यानंतर उद्योगांना किती द्यायचे, जालन्याकडे किती पाठवायचे, असा प्रश्न एमआयडीसी पाणीपुरवठा विभागासमोर आहे. एप्रिल महिन्यापर्यंत काही तालुक्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईल, तोपर्यंत उद्योगांना त्रास होईल, असे एमआयडीसी सूत्रांनी सांगितले.
चारा छावण्यांचा भार एमआयडीसीवर
जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, ५५७ गावे व २२२ वाड्यांवर राहणाºया १२ लाख ५६ हजार नागरिकांना ८०१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ८३, फुलंब्रीतील ३९, पैठण ८६, गंगापूर १२२, वैजापूर ९१, खुलताबाद १९, कन्नड ४१, सिल्लोड ७८, तर सोयगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये टँकर सुरू आहेत. त्यातच चारा छावण्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर देण्यात आली आहे.
फिलिंग स्टेशन वाढवून काय होणार
जायकवाडी मृत जलसाठ्याकडे जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या जॅकवेल, पंपिंगची अडचण येणार आहे. एमआयडीसीच्या पाणी क्षमतेचा विचार जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. धरणातच पाणी कमी झाले तर देणार कुठून, असा प्रश्न आहे. ब्रह्मगव्हाण येथे डब्ल्यूपीटी पंपिंग करून चिकलठाण्यापर्यंत पाणी आणले जाते. ते पंपिंग करून शेंद्र्याकडे पाठविले जाते. १०० कि़मी.चे एमआयडीसीचे नेटवर्क आहे. त्यातून २०० कि़मी.च्या परिसरात पाणीपुरवठा करावा लागतो.

Web Title: Water cutback crisis due to tanker industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.