विजय चाटोरीकर, विजय दहीफळे ठरले ‘मोस्ट स्टायलिश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:06 AM2017-11-18T00:06:06+5:302017-11-18T00:06:21+5:30

कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या साक्षीने मुंबईत नुकताच साई रियल इस्टेट प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचा देदीप्यमान सोहळा रंगला. यात ज्योतिषी डॉ. विजय चाटोरीकर यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी’ व डॉ. विजय दहीफळे यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर’ हा किताब मिळवून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

 Vijay Chatterir, Vijay Dahifale, Most Stylish | विजय चाटोरीकर, विजय दहीफळे ठरले ‘मोस्ट स्टायलिश’

विजय चाटोरीकर, विजय दहीफळे ठरले ‘मोस्ट स्टायलिश’

googlenewsNext

औरंगाबाद : कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या साक्षीने मुंबईत नुकताच साई रियल इस्टेट प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचा देदीप्यमान सोहळा रंगला. यात ज्योतिषी डॉ. विजय चाटोरीकर यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी’ व डॉ. विजय दहीफळे यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर’ हा किताब मिळवून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
तुम्ही स्टायलिश असणे हे आता फक्त ग्लॅमर, फॅशन किंवा उद्योग क्षेत्रासाठीच मर्यादित राहिलेले नाही. सर्वच क्षेत्रात महत्त्वाचे ठरते ते तुमचे व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्रातील अशाच स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. यामध्ये मागील २३ वर्षांपासून ज्योतिषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉ. विजय चाटोरीकर यांना ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी’ म्हणून तर युरोलॉजिस्ट म्हणून कार्य करणाºया डॉ. विजय दहीफळे यांना ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर’ म्हणून गौरविले गेले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा, काजोल, अनन्या बिर्ला, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, करण जोहर, रोहित शेट्टी, जॅकी श्रॉफ, आशुतोष गोवारीकर यांच्यासह हिंदी, मराठी सेलिब्रिटी, ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Vijay Chatterir, Vijay Dahifale, Most Stylish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.