महाराष्ट्राचा गोवा संघावर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:50 PM2017-12-11T23:50:43+5:302017-12-11T23:50:59+5:30

पुणे येथे आज झालेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने गोवा संघावर १0 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Victory over Maharashtra's Goa team | महाराष्ट्राचा गोवा संघावर दणदणीत विजय

महाराष्ट्राचा गोवा संघावर दणदणीत विजय

googlenewsNext
ठळक मुद्देकुचबिहार करंडक : यतीनचे ३४ धावांत ५ बळी

औरंगाबाद : पुणे येथे आज झालेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने गोवा संघावर १0 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर विजयामुळे महाराष्ट्राने या सामन्यात ७ गुणांची कमाई केली.
गोवा संघाने पहिल्या डावात २१५, तर महाराष्ट्राने ३२२ धावा करीत १0७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पिछाडीवर पडलेल्या गोवा संघाने दुसºया डावात २३९ धावा करीत महाराष्ट्रासमोर निर्णायक विजयासाठी १३३ धावांचे लक्ष्य ठेवले. गोवा संघाकडून दुसºया डावात सईश कामत याने ८९ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ४६ व हेरंब परबने ४१ धावा केल्या. आलम खानने ३७ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून यतीन मंगवाणी याने ३४ धावांत ५ गडी बाद केले. त्याला अतनाम व सिद्धेश वरघंटे यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. आकाश जाधवने १ गडी बाद केला. त्यानंतर महाराष्ट्राने विजयासाठीचे १३३ धावांचे लक्ष्य २५ षटकांत एकही गडी न गमावता गाठले. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात १२७ धावा काढणाºया हृषिकेश मोटकरने दुसºया डावात १११ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ७७ धावा केल्या. त्याला साथ देणाºया पवन शाह याने १११ चेंडूंत ६ चौकारांसह ७३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
संक्षिप्त धावफलक : गोवा (पहिला डाव) : २१५. दुसरा डाव : ९६.१ षटकांत सर्वबाद २३९. (सईश कामत ४६, हेरंब परब ४१, आलम खान ३७, मंथन कुथकर ३२. यतीन मंगवाणी ५/३४, सिद्धेश वरघंटे २/८३, अतमन पोरे २/५५, आकाश जाधव १/४५).
महाराष्ट्र : पहिला डाव : ८८ षटकांत सर्वबाद ३२२. दुसरा डाव : बिनबाद १३३. (हृषिकेश मोटकर नाबाद ७८, पवन शाह नाबाद ५४).

Web Title: Victory over Maharashtra's Goa team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.