वैजापुरात 'घरकुल'चा लाभ श्रीमंताना; गरीब अद्यापही प्रतीक्षेतच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 08:16 PM2019-01-17T20:16:55+5:302019-01-17T20:17:58+5:30

यामुळे वंचित लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

In Vaijapur 'gharkul' gains to reach; The poor still waiting | वैजापुरात 'घरकुल'चा लाभ श्रीमंताना; गरीब अद्यापही प्रतीक्षेतच 

वैजापुरात 'घरकुल'चा लाभ श्रीमंताना; गरीब अद्यापही प्रतीक्षेतच 

googlenewsNext

- मोबीन खान 

वैजापुर (औरंगाबाद ) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वैक्षण झालेल्या यादीत अनेक गरीब व पात्र लाभार्थ्यांची नावे असुनही अद्याप त्यांना घरे मिळाली नाहीत. मात्र श्रीमंत लोकांची नावे यादीत असुन त्यांना झटपट प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले मिळत आहेत. मग गरीबांना घरकुले कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असुन सर्वैक्षणातुन तयार केलेल्या यादीबाबत संशय आहे. त्यामुळे गरीबांचे घरकुल श्रीमंतांना मिळत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत असुन वंचित लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

शासनाने ज्यांना राहण्यासाठी घर नाही,जे अनेक वर्षे धोकादायक, जुन्या घरात राहतात त्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यातून सर्वांना घरे देण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे.मध्यंतरी सर्वांच्या घरोघरी जावून सामाजिक,आर्थिक,जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले.त्यावेळी सर्व्हे करणारांनी जी माहिती जमा केली,त्या आधारावर शासनाने काही निकष,अटी-शर्ती लावून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यादी तयार केली आहे.त्या सर्वेत मिळालेल्या माहितीवरून तयार करण्यात आलेल्या यादीतून ज्यांनी त्यांचे आयुष्य धोकादायक घर, कुडामेडाच्या घरात घालवले,ते त्या यादीत आलेच नाहीत.

अनेकांना अशी यादी असते याची पुसटशी कल्पनासुध्दा नाही,असे अनेक गरजू लोक,महिला या यादीपासून वंचित राहिल्याने सर्व्हे कसा केला,याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.शासनाने केलेल्या यादीनुसार शासनाला जरी गरजूंना घरे दिली असे वाटत असले तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी या घरकुलांपासून वंचित राहिले आहेत.त्यातील अनेकजण साठी ओलांडलेले आहेत. त्यात हातावर पोट असणारी बहुतांश कुटुंबे आहेत.ज्यांनी जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी, निवाऱ्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला अशांना शासनाच्या योजनेतून घरे मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: In Vaijapur 'gharkul' gains to reach; The poor still waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.