‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:31 AM2018-08-14T01:31:26+5:302018-08-14T01:31:47+5:30

‘जब तक सूरज चांद रहेगा.... देश में संविधान रहेगा’, संविधान जलानेवालोंको.....जुते मारो, जुते मारो, संविधान जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

'Until sun, moon will remain, there will be constitution in the country' | ‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’

‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘जब तक सूरज चांद रहेगा.... देश में संविधान रहेगा’, संविधान जलानेवालोंको.....जुते मारो, जुते मारो, संविधान जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, आमदार सुभाष झांबड आदींनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे यांनी या आंदोलनाचे नियोजन केले होते. तसेही गेल्या २ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व कोळी आरक्षणासाठी साखळी उपोषण चालूच आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्वत: येऊन निवेदन स्वीकारावे असा आग्रह आंदोलकांनी धरला. पण जिल्हाधिकारी व्हीसीमध्ये असल्याने ते येऊ शकले नाहीत. मात्र रास्ता रोको करून गैरसोय निर्माण न करण्याची त्यांनी केलेली विनंती आंदोलकांनी ऐकली.
या आंदोलनात जगन्नाथ काळे, किरण पा. डोणगावकर, विलास औताडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, डॉ. पवन डोंगरे, इब्राहिम पठाण, राहुल सावंत, आतिष पितळे, इब्राहिमभय्या पटेल, भाऊसाहेब जगताप, जितेंद्र देहाडे, साजिद पठाण, अशोक डोळस, किशोर तुळसीबागवाले, संतोष दीडवाले, अ‍ॅड. इगबालसिंग गिल, शेषराव तुपे पाटील, हरचरणसिंग गुलाटी, आकेफ रझवी, शेख अथर, रेखा जैस्वाल, छाया मोडेकर पाटील, विजया भोसले, अरुणा लांडगे, संजीवनी महापुरे, फातेमाबी शेख, अनिता भंडारी, वैशाली तायडे, सुहासिनी घोरपडे, अर्चना मंत्री, बाबूराव कवसकर, रमजानीखान, राजू देहाडे, प्रवीण केदार, गुलाब पटेल, कल्याण कावरे, नंदकुमार सहारे, मेहबूब बागवान आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: 'Until sun, moon will remain, there will be constitution in the country'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.