‘अमृत’मयी सुरांचा अनोखा नजराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:17 AM2017-08-17T01:17:54+5:302017-08-17T01:17:54+5:30

गायक, संगीतकार मिथुन शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सुप्रसिद्ध गायक शान तसेच आजच्या तरुणांच्या ओठांवर ज्यांचे गीत असतात अशा तरुणाईला भुरळ घालणाºया अनेक गायकांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला.

Unique feature of 'Amrit' moments | ‘अमृत’मयी सुरांचा अनोखा नजराणा

‘अमृत’मयी सुरांचा अनोखा नजराणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गायक, संगीतकार मिथुन शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सुप्रसिद्ध गायक शान तसेच आजच्या तरुणांच्या ओठांवर ज्यांचे गीत असतात अशा तरुणाईला भुरळ घालणाºया अनेक गायकांचा कलाविष्कार रसिकांना बुधवारी सायंकाळी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात अनुभवायला मिळाला. यानिमित्ताने औरंगाबादकरांनी आकर्षक रोषणाईने सजलेल्या ‘लाइव्ह म्युझिकल क ॉन्सर्ट’चा आस्वाद घेतला.
एमजीएम, शहर पोलिसांतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले, कॅन्सरग्रस्त आणि पोलीस कर्मचाºयांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यासाठी चॅरिटी शोचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अमृता फडणवीस, अभिनेत्री अमिषा पटेल, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, एमजीएम संस्थेचे अंकुशराव कदम, आयकर विभागाचे श्रीवास्तव, माजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त डॉ. दीपाली घाटगे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मिथुन यांनी ‘तुम ही हो...’ या तरुणाईला वेड लावणाºया गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गायक अल्तमाश फरिदी यांनी ‘हम जो हर मौसम पे..’ हे गीत गाऊन रसिकांची दाद मिळविली. गायिका जोनेता गांधी हिने ‘ये कसूर मेरा है’ हे गीत गात रंगमंचावर प्रवेश केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मोहम्मद इरफान यांनी गायलेले ‘दिल मेरा है नासमझ कितना’ हे गाणेही रसिकांना विशेष आवडून गेले. शरद कपूर, गजेंद्र वर्मा, युविका चौधरी, पलक मचल, बालकलाकार हर्षालीनेही कलाविष्कार दाखविला. समारोप मदन मोहन यांच्या ‘लगजा गले के फिर...’ या सदाबहार गाण्याने झाला. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, लोकमत सखी मंचच्या आशू दर्डा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Unique feature of 'Amrit' moments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.