उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:44 PM2019-06-15T22:44:58+5:302019-06-15T22:45:27+5:30

गुन्हेगारी सोडल्याचे सांगत वर्षभरापासून उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (३२, रा. छोटा मुरलीधरनगर) याला सातारा परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेने अटक केली.

Unidentified asshole who was cleaning work in Usmanpura police station | उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत

उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद : गुन्हेगारी सोडल्याचे सांगत वर्षभरापासून उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (३२, रा. छोटा मुरलीधरनगर) याला सातारा परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेने अटक केली.
सातारा परिसरातील देवडानगर येथील रहिवासी संतुक कवठेकर यांचे घर चोरट्यांनी १३ मे रोजी फोडले होते. या घटनेत सोन्याचे गंठण, कर्णफुले, अंगठी आणि रोख रकमेसह ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याविषयी सातारा ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या घटनेनंतर ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शिवाय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. ठसे तज्ज्ञांनी नुकताच याबाबतचा अहवाल गुन्हे शाखेला दिला. या अहवालानुसार घटनास्थळावरील बोटाच्या ठशांचे नमुने आणि कल्ल्याच्या हाताच्या ठशाचे नमुने एकच असल्याचे निष्पन्न झाले. याआधारे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकुमार भंडारे, कर्मचारी लालखॉ पठाण, बापूराव बावस्कर, नंदू चव्हाण, योगेश गुप्ता आणि चालक दादासाहेब झारगड यांच्या पथकाने कल्ल्या ऊर्फ कलीम खानला शुक्रवारी रात्री त्याच्या घरातून उचलले. त्याला पुढील कारवाईसाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले.
अकरा महिने होता कारागृहात
वाटमारी आणि घरफोडीच्या गुन्ह्याचे शतक केलेला कल्ल्या ऊर्फ कलीम खान हा पोलिसांना चकमा देण्यात पटाईत. दोन वर्षांपूर्वी उस्मानपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने कल्ल्याला परभणी रेल्वेस्टेशन परिसरातून पकडून आणले होते. पोलीस कोठडीदरम्यान त्याने एक डझनभर गुन्ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांना काढून दिला होता. तेव्हापासून तो ११ महिने कारागृहात होता. जामिनावर सुटल्यानंतर कल्ल्याने सातारा परिसरात कवठेकर यांचे घर फोडले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला रोज उस्मानपुरा ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक होते. त्यामुळे तो रोज उस्मानपुरा ठाण्यात हजेरी लावण्यासाठी येई. तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी त्याचे समुपदेशन करून गुन्हेगारी सोडण्यास प्रवृत्त केले. तेव्हापासून तो पोलीस ठाण्याची सफाई करण्याचे काम करतो. दरम्यान, जुन्या गुन्ह्यात त्याला शुक्रवारी अटकेला सामोरे जावे लागले.

Web Title: Unidentified asshole who was cleaning work in Usmanpura police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.