लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़
धर्माबाद-मनमाड या मार्गावर परभणी हे रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे़ या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ सुमारे ८० रेल्वे गाड्यांची वाहतूक असलेल्या या रेल्वे स्थानकाचा महसूलही लाखो रुपयांच्या घरात आहे़ मात्र सुविधा देण्यासाठी प्रशासन कासवगतीचा मार्ग अवलंबत आहे़ रेल्वे विभागाच्या आदर्श स्थानकाच्या यादीत परभणीचा नंबर लागला खरा़ परंतु, विकास कामे संथगतीने सुरू आहेत़ रेल्वे प्रवाशांबरोबरच प्रवासी संघटना सुविधांसाठी ओरड करीत असताना प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही़
धर्माबाद ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या कामातील पहिला टप्पा पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाला़ परभणी ते मिरखेल हा दुहेरी रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला़ या मार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वे वाहतूक सोयीची होईल, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक काटेकोर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ पूर्वीपेक्षाही अडचणीत भर पडली आहे़ मागील पाच महिन्यांपासून एकही रेल्वे गाडी परभणी स्थानकावरून वेळेनुसार धावत नाही़ विशेषत: नांदेडकडून मनमाडकडे जाणाºया गाड्या सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे़ परभणी रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद, मनमाड, नाशिक आणि मुंबई येथे जाणाºया रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे़
विशेष म्हणजे जिल्ह्याची राजकीय मंडळी मुंबईला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे़ परंतु, याच प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नांदेडहून मनमाडकडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर लावल्या जात आहेत़
परभणी रेल्वे स्थानकावर एक्सलेटर (सरकत्या शिड्या) नसल्याने प्रवाशांना दादरा चढून प्लॅटफॉर्म गाठावा लागतो़ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुविधाच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ त्यातच रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तासापर्यंत उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या मन:स्तापात भर पडली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे कोचेसची पोझीशन दाखविणारे फलक नाहीत़ तसेच रेल्वे गाड्यांची माहिती देणारे बोर्डही या ठिकाणी नाहीत़ परिणामी आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोचचा अंदाजा घेवूनच प्लॅटफॉर्मवर थांबावे लागते़ रेल्वे गाडी आल्यानंतर अनेक वेळा आरक्षणाचा डबा दूर अंतरावर असतो आणि त्यानंतर धावपळ करीत जागा पकडावी लागते़ पाच महिन्यांपासून प्रवाशी या समस्यांना सामोरे जात आहेत़ रेल्वे प्रशासनाने किमान पोझीशन बोर्ड लावले तरी प्रवाशांची सुविधा होवू शकते़ परंतु, प्रशासन मात्र हे साधे कामही करण्यासाठी पुढाकार घेत नाही़
रेल्वे दुहेरीकरणानंतर प्रवाशांना या असुविधा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत़ औरंगाबाद-मनमाडकडे जाणाºया प्रवाशांना आपली जागा मिळेपर्यंत धाकधूक असते़ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांचीही पुरेशी व्यवस्था केली नाही़ परिणामी चोरीच्या घटना वाढत आहेत़ रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेवून त्वरित सुविधा पुरवाव्यात, प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.