जळगाव जिल्ह्यातील अपघातात सोयगाव तालुक्याचे २ तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:49 AM2019-03-25T00:49:10+5:302019-03-25T00:49:30+5:30

डंपरची दुचाकीला धडक : मृत घाणेगाव तांड्यावरील रहिवासी

 Two youths killed in Soygaon taluka in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील अपघातात सोयगाव तालुक्याचे २ तरुण ठार

जळगाव जिल्ह्यातील अपघातात सोयगाव तालुक्याचे २ तरुण ठार

googlenewsNext

सोयगाव : जळगाव येथे लग्नमंडपाचे साहित्य खरेदीसाठी जात असलेल्या सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथील दुचाकीस्वारांना डंपरने धडक दिल्याने दोन तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी शहापूर (ता. जामनेर) गावाजवळील वळण रस्त्यावर घडली.
सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा योगीराज किसन राठोड (३०), श्याम विष्णू जाधव (१८) हे दोघे मंडपाच्या साहित्य खरेदीसाठी जळगावला दुचाकीने जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने योगीराज राठोड हा जागीच ठार झाला तर श्याम जाधव याचा जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. यावेळी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन देऊळगाव गुजरीकडे जात असताना त्यांनी घटनेची माहिती जामनेरला दिल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. योगीराजचा जागीच मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तर जखमी श्यामला जळगावला हलविण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विकास पाटील पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title:  Two youths killed in Soygaon taluka in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.