वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 09:58 PM2019-02-22T21:58:47+5:302019-02-22T21:58:53+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी आसेगाव फाटा येथे घडली.

Two wheelers killed in the vehicle | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

googlenewsNext

वाळूज महानगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी आसेगाव फाटा येथे घडली. दुचाकीस्वाराच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांंवरून त्याची ओळख पटली असून, जगदीश उपलिंग चव्हाण (२९) असे त्याचे नाव आहे.


मुंबई-नागपूर महामार्गावरील आसेगाव फाटा येथे पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. रस्त्याच्या कडेला एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच दुचाकी (एमएच-१७, एमएक्स७०६५) आढळून आली. पोलिसांनी बेशुद्ध तरुणास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, मयताच्या खिशाची झडती घेतली असता पोलिसांना जगदीश उपलिंग चव्हाण (२९, रा.अनकुटे, ता.येवला, जि.नाशिक) या नावाचे आधार कार्ड मिळून आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
-------------

Web Title: Two wheelers killed in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.